JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अचानक दारू पिणं सोडल्यास शरीरावर काय होतो परिणाम?

अचानक दारू पिणं सोडल्यास शरीरावर काय होतो परिणाम?

लोक हल्ली सहज मद्यपान करतात. मात्र जर तुम्ही वारंवार मद्यपान करत असाल आणि त्यानंतर तुम्ही अचानक मद्यपान सोडल्यास त्याचेही तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 ऑक्टोबर : हल्ली दारू पिणं म्हणजेच अल्कोहोल घेणं खूप सामान्य गोष्ट झाली आहे. लोक आनंद साजरा करण्यासाठी बऱ्याचदा समवयस्कांसोबत मद्यपान करतात. शनिवार रविवार हे तर मद्यपानासाठी राखीव असलेले दिवस असतात. कारण या दिवशी लोकांना सुट्टी असते. थोडक्यात लोक हल्ली सहज मद्यपान करतात. मात्र जर तुम्ही वारंवार मद्यपान करत असाल आणि त्यानंतर तुम्ही अचानक मद्यपान सोडल्यास त्याचेही तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होतात. The Health Site.com ने दिलेल्या माहितीनुसार, अचानक मद्यपान बंद केल्यास आपल्या शरीरावर त्याचे कसे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणूनच मद्यपान करणे कायमचे सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. जाणून घेऊया अचानक मद्यपान सोडल्यास तुमच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात.

Too Much Exercise Side Effects : तुमची एक चूक आणि तुम्हाला फिट ठेवणारा व्यायामही घेऊ शकतो तुमचा जीव

संबंधित बातम्या

झोप कमी होणे मद्यपान केल्यानंतर साधारणपणे कोणत्याही व्यक्तीला शांत आणि लवकर झोप लागते. ज्या लोकांना कायम मद्यपान करून झोपण्याची सवय असते. त्यांना मद्यपान सोडल्यास कित्तेक दिवस लवकर झोप लागत नाही. कारण तुमच्या मन आणि मेंदूला मद्यपान केल्यानंतरच शांत होण्याची सवय लागलेली असते. रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने सकाळी थकवा आणि आळस येऊ शकतो. मात्र असे काही दिवस होईल. काही दिवस हा त्रास सहन केल्यास तुमची मद्यपानाची सवय सुटेल आणि त्यानंतर तुम्ही आनंदी आणि स्वस्थ जीवन जगू शकता.

अस्वस्थता वाटणे नेहमी मद्यपान करणाऱ्या लोकांनी जर अचानक मद्यपान करणे सोडले तर त्यांना खूप अस्वस्थ वाटू शकते. जेव्हा आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लागलेली असते त्यानंतर ती गोष्ट आपण अचानकपणे सोडल्यास आपले शरीर थोडेअस्वस्थ होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. तुमची ही अस्वस्थता काही दिवसात दूर होईल. भूक न लागणे अचानक दारू पिणे बंद केल्याने व्यक्तीची भूकदेखील कमी होते. मात्र इच्छा नसटतानाही काहीतरी खाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. यामुळे तुमच्या तब्येतीवर जास्त परिणाम होणार नाही. मात्र भूक न लागणे खूप वाढले असेल तर एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना? चिडचिड होणे लहान मुलांना जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा ते खूप चिडचिड रागराग करतात. हा मानवी स्वभावच असतो. कालांतराने कोणत्याही गोष्टीवची आपल्या शरीरालाही सवय लागते. त्यानंतर जर ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपली चिडचिड होते. आपल्याला खूप राग येतो. दारू अचानक सोडल्याशी असेच घडते. त्यामुळे मद्यपान सोडतातनं तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा मिळवणंही शिकावं लागेल. जाणीवपूर्वक आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या