JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ओ तेरी! हे काय? पाण्यात तरंगता तरंगता हवेत उडू लागलं भलंमोठं जहाज

ओ तेरी! हे काय? पाण्यात तरंगता तरंगता हवेत उडू लागलं भलंमोठं जहाज

पाण्याऐवजी आकाशात तरंगणारं जहाज (ship floating across the sky) एका तरुणानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्याचा फोटोही शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

एडिनबर्ग, 04 मार्च : विमान कुठे उडतं आकाश आणि जहाज पाण्यात. अगदी चिमुरड्यांना जरी हा प्रश्न विचारला तर तेसुद्धा असंच उत्तर देतील आणि तेच बरोबर आहे. आपण नेहमी आकाशात विमान आणि पाहण्यात जहाजच पाहत आलो आहोत. पण कधी जहाजाला आकाशात तरंगताना (ship floating across the sky) पाहिलं आहे का? कदाचित हो, पाहिलंही असेल पण ते फक्त फिल्म्समध्ये. प्रत्यक्षात कधी असं घडताना पाहिलं आहे का?. हा प्रश्न वाचूनच तुम्हाला हसू येईल. काय आकाशात कधी जहाज तरंगतं का? असंच तुम्ही म्हणाला. पण स्कॉटलंडमध्ये (Scotland) असं घडलं आहे. स्कॉलंडच्या बँफमध्ये (Banff) एक जहाज पाण्याऐवजी चक्क आकाशात तरंगताना दिसलं. एका तरुणानं हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. कॉलिन मैक्कलम (Colin McCallum) असं या तरुणाचं नाव आहे.

Saw a real life optical illusion in Banff today 😱 Posted by Colin McCallum on  Friday, 26 February 2021

कॉलिन 26 फेब्रुवारीला बँफहून जात होता, चेव्हा तिचं अचानक एक जहाज आकाशात तरंगत असल्याचं दिसलं. जसा तुम्हाला वाचून यावर विश्वास बसला नाही तसाच त्याला प्रत्यक्षात पाहूनही विश्वास बसला नाही. मग तर त्याने असं काही आपण पाहिल्याचं दुसऱ्या कुणाला सांगितलं असतं तर त्याचंच हसू झालं असतं. पण जेव्हा त्याला असं काही दिसलं तेव्हा त्याने आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केलं आणि त्याचे फोटो त्याने शेअर केला. हे वाचा -  VIDEO - 12व्या मजल्यावरून कोसळली चिमुकली; सुपरहिरोसारखं डिलीव्हरी बॉयनं केलं कॅच फोटोत पाहू शकता आकाशात एक लाल रंगाचं जहाज तरंगताना दिसतं आहे. या जहाजाचा खालील निम्मा भाग पूर्णपणे अदृश्य आहे.  कॉलिन म्हणाला, जेव्हा मी पहिल्यांदाज हे जहाज पाहिलं, तेव्हा मला एक डबल टेक करावा लागला कारण मला खरंच वाटलं की हे जहाज तरंगत आहे. पण जेव्हा मी या जहाजाच्या जवळ गेलो तेव्हा पाहिलं की खरंतर एक ऑप्टिकल भ्रम होतं. हे वाचा -  या महिलेनं फेसबुकवर का पोस्ट केला टॉयलेटमधला खासगी फोटो? हा फोटो व्हायरल होताच त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यानं सांगितलं की, किनाऱ्यावर ढग जमा झाल्यानं असं झालं आहे. पाणी आणि जमीन एक झाल्यासारखं वाटू लागलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या