JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Sexual Wellness : ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी काही उपाय आहे का?

Sexual Wellness : ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी काही उपाय आहे का?

माझ्या स्तनांच्या आकारामुळे (Breast size) मी चिंतित असते.

जाहिरात

स्तनपान बंद झाल्यानंतर महिलांना स्तनांमध्ये वेदना व्हायला सुरुवात होतात. स्तन लटकणं, कडक होणं,जड होणं, ताप येणं, निपलमधून दूध पाझरणे अशा समस्या यायला लागतात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रश्न : मी 24 वर्षांची आहे. माझ्या स्तनांच्या आकारामुळे (Breast size) मी चिंतित असते. त्यांचा आकार वाढवण्यासाठी कोणता मार्ग आहे का? उत्तर : फोटोशॉपसारख्या टूल्सच्या सहाय्याने दाखवल्या जाणाऱ्या अनैसर्गिक सौंदर्याचे मापदंड पाहता तुम्हाला तुमच्या शरीराविषयी असणारी चिंता ही रास्त आहे. जेव्हा स्त्रीचे शरीर आणि लैंगिकतेबद्दल विचार केला जातो तेव्हा मोठे (स्तन) असणं चांगलं असंच मानलं जातं. दुर्देवाने स्तनांचा आकार वाढवण्याचा कोणताही खात्रीशीर नैसर्गिक पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे नैसर्गिक उपाययोजनांच्या नावाखाली दिले जाणारे सप्लिमेंटस, आकार वाढवणारे पंप, आहार, औषधी वनस्पती, मालिश करण्यासाठीच्या क्रिम्स यांच्या जाहिरातींपासून सावध राहावं. या सर्व गोष्टी केल्याने स्तनांचा आकार वाढल्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. हे वाचा -  Sexual Wellness : कामक्रीडेदरम्यान काखेत चाटणं हे नॉर्मल आहे का? परंतु स्तनांचा आकार वाढावा या तुमच्या इच्छेमागे अनेक कारणं असू शकतात. तुमच्या स्तनांबाबत एखाद्याने टिप्पणी केल्यामुळे तुम्ही दुःखी आहात का? तसंच तुम्ही नकळतपणे स्वतःची सोशल मीडियावर एखाद्याशी तुलना करत आहात का? मोठे स्तन अधिक चांगले असतात,असं तुम्हाला कदाचित वाटतं का? असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं अधिक फायद्याचं ठरेल. तुमचा हा आग्रह का आहे, असुरक्षिततेनं तुम्हाला असं वाटतं का हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तथापि जर तुम्हाला स्तनांचा आकार मोठा हवा असेल तर तुम्ही छाती, पाठ, खांदा आणि वजन वाढवणारे काही व्यायाम करू शकतात. असे करुन देखील लगेच मोठा बदल जाणवेल अशी अपेक्षा ठेवू नका. तो बदल अगदीच नाममात्र असेल. प्रत्यक्षात स्तनांचा आकार वाढवण्याची एकमेव विश्वासार्ह पद्धत म्हणजे शस्त्रक्रिया. या पद्धतीत स्तनांचा शस्त्रक्रियेच्या सहाय्याने आकार वाढवता येतो. परंतु त्यासोबतच संसर्गाचा मोठा धोका असतो. हे वाचा -  Sexual Wellness : हायमेन ब्रेक करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? आपल्या शरीराचा एखादा घटक बदलण्याची इच्छा बाळगणं ही नक्कीच वाईट गोष्ट नाही. परंतु त्यासंबंधित जोखमींचा भार उचलणं देखील महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा नाही परंतु आपल्या शरीराचा नैसर्गिक आकार आणि रचना धोक्यात आणण्यासारखे दुसरे काहीही नाही. मला आशा आहे की तुमच्या स्तनांचा आकार कितीही चांगला असला तरीही आपण सुंदर आहात कारण एक व्यक्ती म्हणून तुम्हाला परिभाषित करणारे ते वैशिष्ट्यं ठरू शकत नाही. शेवटी निर्णय तुमचाच आहे. तुम्ही शस्त्रक्रियेचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतल्यास विश्वसनीय वैद्यकिय व्यवसायिकाशी सल्लामसलत मात्र नक्की करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या