JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'पहिलं किस केल्यानंतर तो माझ्या मेसेजलाही रिप्लाय देत नाही, मी त्याला आवडत नाही का?'

'पहिलं किस केल्यानंतर तो माझ्या मेसेजलाही रिप्लाय देत नाही, मी त्याला आवडत नाही का?'

पहिला स्पर्श झाल्यानंतर अनेकदा कपलमध्ये असा दुरावा येतो आणि त्यामुळे मनात बऱ्याच शंका निर्माण होता. अशी परिस्थिती म्हणजे नेमकं काय याबाबत sexual wellness तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रश्न : मी बागेमध्ये एका मुलासोबत फिरायला गेले होते. त्यावेळी त्याने मला किस आणि स्पर्श केला. त्यानंतर मी त्याला अनेकवेळा मेसेज केला. पण त्याच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. याचा अर्थ मी त्याला आवडत नाही असा होतो का? उत्तर : खरं तर या गोष्टीत तुम्ही खूप घाई करत आहात. ज्ञात आणि अज्ञातामध्ये तुम्ही आहात.  तुम्ही त्याला आवडता हे तुम्हाला माहित आहे. पण खरंच आवडता की नाही याबद्दल तुमच्या मनात संभ्रम आहे. त्याच्या वेगळेपणामुळे तुम्ही त्याचं हे प्रारंभिक आकर्षण रेखाटत आहात. अनेक जणांच्या मैत्रीमध्ये शरीरसंबंध असतात. तुमच्या प्रकरणात तुमच्यासाठी एक किसदेखील याच पद्धतीचं दर्शक असेल. पण दुसऱ्या व्यक्तीसाठी किस म्हणजे शरीरसंबंध असू शकत नाही. अनेकांसाठी एका रात्रीसाठी ठेवलेले शरीरसंबंध फार महत्त्वाचे नसतील. त्यांच्यासाठी तो केवळ एक क्षण असेल. पण काही जणांसाठी ते आयुष्यभराचे भावनिक क्षण असतात. त्यामुळे प्रत्येक जण नात्यामध्ये वेगवेगळा विचार करतो आणि प्रत्येकाची नातं निभावण्याची पद्धत वेगळी आहे हे आधी लक्षात घ्या. हे वाचा -  Sexual Wellness : मला Anal Sex हवंय पण पत्नी तयार नाही, तिचं मन कसं बदलू? त्यामुळे हा विषय जुलै महिन्यातील पिकलेल्या आंब्याप्रमाणे लोंबकळत न ठेवता तुम्हाला त्याच्याविषयी काय भावना आहेत हे भेटून सांगून टाका. तुमच्या मनातील भावना त्याला स्पष्टपणे सांगा. यामध्ये नकार मिळण्याचा धोका असला तरीदेखील डेटिंग गेममध्ये राहायचं असल्यास तुम्हाला हा नकार पचवावा लागेल. हे वाचा -  Sexual wellness : पहिल्यांदाच सेक्स; भीतीवर मात कशी करू? जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात दुसऱ्याला संधी देत आहात. तुम्हाला नकार मिळेल या भीतीनं तुम्ही जर पुढील पाऊल उचलणार नसाल तर तुम्ही स्वतःच स्वतःला नाकारत आहात. त्यामुळे यातून बाहेर पडून तुम्ही समोरील व्यक्तीला काय वाटते हे खुलेपणाने विचारायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या