Home /News /lifestyle /

Sexual Wellness : मला Anal Sex हवंय पण पत्नी तयार नाही, तिचं मन कसं बदलू?

Sexual Wellness : मला Anal Sex हवंय पण पत्नी तयार नाही, तिचं मन कसं बदलू?

फोटो सौजन्य -  Pixabay

फोटो सौजन्य - Pixabay

सेक्समध्ये तुम्हाला एखादी पोझिशन आवडत असते पण जोडीदार तयार नसतो, त्यावेळी काय करावं याबाबत तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन.

प्रश्न : मला Anal Sex आवडतं, पण माझी पत्नी त्यासाठी तयार नाही. उत्तर : मला हे ऐकून वाईट वाटलं. परंतु तुम्ही तुमच्या बायकोच्या दृष्टिकोनातून देखील विचार करून पाहायला हवा. ज्या गोष्टींमुळे आपण अस्वस्थ आहात त्या गोष्टी नाही का? समजा तुमच्या जागी ती असती आणि तिनं तुम्हाला ॲनल सेक्स करायचा आग्रह धरला असता तर तुम्ही तिला काय करायला सांगितलं असतं याचा विचार करा. खरं तर काहीजण अशा  प्रकारच्या संबंधांमध्ये कम्फर्टेबल (Comfortable Sex) नसतात. यामुळे तुम्ही यासाठी त्यांना फोर्स करू शकत नाही किंवा त्यांचे विचार बदलण्याचे प्रयत्न करू शकत नाही. कुणाला कशातून आनंद मिळतो आणि ते कशा प्रकारे मिळवतात हा पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष प्रश्न असून त्यांना कोणत्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही. आपण विचार केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला साध्य होतेच असं नाही. खासकरून दुसऱ्या व्यक्तीकडून हवी असलेली गोष्ट मिळवताना त्याच्या मनाचा आणि त्याच्या मतांचा विचार करावा लागतो. तुम्ही अ‍ॅनल सेक्स करण्यावर ठाम असाल तर तुमच्या पत्नीऐवजी अशा पद्धतीने तुमच्याबरोबर संबंध ठेवण्यास तयार असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा (Another sex partner) शोध घ्या आणि बायकोच्या परवानगीने तसं करा. यासाठी तिच्यावर दबाव आणू नका किंवा तिला असे करण्यास भाग पाडू नका. हे वाचा - Sexual Wellness: 'सेक्ससाठी पत्नी उत्सुक नसते; माझी लैंगिक इच्छा पूर्ण कशी करू?' तुमच्या पत्नीबरोबर याविषयी चर्चा करा. याविषयी तिला काही भीती किंवा चिंता आहे का याचा तपास करा. यामुळे तिला या पद्धतीने संबंध ठेवण्यास भीती वाटत आहे का याचा शोध घ्या. असं काही असेल तर तिच्याबरोबर चिंता आणि भीती याविषयी चर्चा करून तुमच्याबरोबर मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित करा. स्वतःला शिक्षित करा आणि तिला असं करण्यास प्रोत्साहित करा. जर तिच्या शंकांचं निराकरण झालं तर चांगलंच नाहीतर आहे ती परिस्थिती  स्वीकारून तुम्ही पुढे जा. भीती आणि चिंता नेहमी तर्क किंवा स्पष्टीकरणाने नाहीश्या होतात असं नाही. एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटणं आणि ती का वाटत आहे हे माहीत नसणं देखील सर्वसाधारण आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या