JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Ovulation Date : कशी ओळखाल तुमची ओव्ह्युलेशनची तारीख? ही आहे अचूक पद्धत

Ovulation Date : कशी ओळखाल तुमची ओव्ह्युलेशनची तारीख? ही आहे अचूक पद्धत

गर्भधारणेसाठी महिन्याला ओव्हुलेशन कधी होऊ शकते याची तारीख मोजणे आवश्यक आहे. ही तारीख कशी मोजावी हे प्रत्येकाला माहित नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर : आई होणं ही कोणत्याही महिलेसाठी खूप आनंददायी आणि सुंदर भावना आहे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यात हा अनुभव घेण्याची इच्छा असते. मात्र काही स्त्रियांना गर्भधारणेस समस्या येतात. बऱ्याचदा योग्यवेळी संभोग ना केल्यामुळे हे होते. स्त्रियांच्या ओव्ह्युलेशनच्या दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवणे गरजेचे असते. गर्भधारणेसाठी महिन्याला ओव्हुलेशन कधी होऊ शकते याची तारीख मोजणे आवश्यक आहे. स्त्रीच्या गर्भधारणेच्या प्रवासातील पहिली पायरी म्हणजे तिच्या मासिक पाळीत ती सर्वात जास्त प्रजननक्षम आहे हे जाणून घेणे. प्रजननक्षम दिवस म्हणजेच ओव्ह्युलेशनचे दिवस तुम्हाला माहित नसले तरी तुम्ही मासिक पळीनंतरचे तुमचे ओव्ह्युलेशनचे दिवस मोजू शकता. ही तारीख कशी मोजावी हे प्रत्येकाला माहित नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत.

प्रेग्नन्सीमध्ये जास्त प्रमाणात हळद खाणे हानिकारक आहे का? पाहा काय म्हणतात डॉक्टर

संबंधित बातम्या

ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं काय? ओव्ह्युलेशन हा स्त्रीच्या शरीरातल्या प्रजननाच्या चक्राचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्या वेळी अंडाशयातून बीजांड बाहेर पडून ते फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं. पुरुषाच्या वीर्यातून आलेल्या शुक्राणूकडून त्या बीजांडाचं फलन होतं, तेव्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये भ्रूण तयार होतो. नंतर तो यूटेरसमध्ये जाऊन गर्भ म्हणून विकसित होत जातो. शुक्राणूंकडून बीजांडं फलित केलं गेलं नाही, तर अशी अफलित बीजांडं नंतर मासिक पाळीच्या वेळी होणऱ्या रक्तस्रावातून बाहेर पडतात.

ओव्ह्युलेशनची लक्षणं ओव्ह्युलेशनची लक्षणं प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकतात. सौम्य दुखी जाणवू शकते, स्पॉटिंग होऊ शकतं, संभोगाची इच्छा वाढू शकते, स्तनांमध्ये नाजूकता येते, व्हजायनामधून बाहेर पडणाऱ्या स्रावाचं प्रमाण वाढू शकतं, त्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये बदल होऊ शकतो. ते निर्मळ आणि एग व्हाइटप्रमाणे बुळबुळीत असू शकतं. याव्यतिरिक्त ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, बेसल बॉडी टेम्परेचर, ओव्ह्युलेशन प्रेडिक्शन किट्स, ओव्ह्युलेशन इंडिकेटर अॅप्लिकेशन्स आदींच्या माध्यमातून किंवा ट्रॅकिंग कॅलेंडर ठेवून ओव्ह्युलेशनचा कालावधी ओळखता येऊ शकतो. ओव्ह्युलेशनचे दिवस कसे ओळखावे? The Health Site ने दिलेल्या माहितीनुसार, नियमित मासिक पाळी असलेल्या महीलांना सामान्यपणे दर महीन्याच्या 26 ते 32 दिवसांनी पाळी येते. मात्र मासिक पाळीचे चक्र अनियमित, छोटे किंवा मोठे असणा-या महीलांमध्ये हे दिवस याप्रमाणे नसतात. त्यामुळे मासिक पाळीतील प्रत्येक चक्राच्या नोंदी तुमच्याकडे असू द्या. तुमची मासिक पाळी लहान किंवा छोटी असेल तर तुमच्या चक्रातून अठरा ही संख्या वजा करा. म्हणजे जर तुम्हाला 26 दिवसांनी मासिक पाळी येत असेल तर त्यातून अठरा वजा केल्यावर आठ हा आकडा येईल. त्याचप्रमाणे मोठ्या मासिक पाळीच्या चक्रातून 11 ही संख्या वजा करा. तर 32 दिवसांनी पाळी येत त्यातूनही 11 वजा केल्यावर 21 हा आकडा येईल. मासिक पाळीच्या पहील्या दिवसापासून कॅलेंडरवर नोंद करण्यास सुरुवात करा व तुम्ही मोजलेल्या दिवसावर एक वर्तुळ करुन ठेवा उदा. 22 आणि 7 हे अंक आल्यास मासिक पाळीच्या सातव्या िदवसापासून ते 22 व्या दिवसापर्यंत तुम्ही गर्भाधारणे साठी प्रयत्न करु शकता. बिर्याणीतल्या मसाल्यांमुळे पुरुषांचा सेक्स ड्राइव्ह खरंच कमी होतोय का? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर तुम्ही एका वर्षापासून आठवड्यातून दोनदा शारीरिक संबंध ठेवत असाल आणि तरीही तुम्ही गरोदर होत नसाल तर इतर काहीतरी प्रॉब्लेम असण्याची असू शकते आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमचे वय 35 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, गर्भधारणेचा प्रयत्न केल्यानंतर 6 महिन्यांनी गायनॅकोलॉजिस्ट भेटा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या