JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आता MASK च करणार कोरोनाव्हायरसचा नाश; एकच मास्क पुन्हा पुन्हा वापरताही येणार

आता MASK च करणार कोरोनाव्हायरसचा नाश; एकच मास्क पुन्हा पुन्हा वापरताही येणार

इज्राइलच्या (Israel) शास्त्रज्ञांनी असा मास्क (Mask) तयार केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हाइफा, 21 जून : कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी आपण मास्क वापरतो आहे. मात्र आता हाच मास्क कोरोनाव्हायरसचा नाश करणार आहे. इज्राइलच्या (Israel) शास्त्रज्ञांनी असा मास्क (Mask) तयार केला आहे. विशेष म्हणजे हा मास्क पुन्हा पुन्हा (Reusable Mask)  वापरता येणार आहे. या मास्कचं वैशिष्ट्य म्हणजे चार्जरने ऊर्जा मिळवून हा मास्क कोरोनाव्हायरसचा नाश करेल. चार्जर लावल्यानंतर मास्कच्या आतील कार्बन फायबरचा स्तर 70 डिग्री सेल्सियसपर्यंत गरम होईल. जे व्हायरसला मारण्यासाठी पुरेसं आहे, असं शास्त्रज्ञ म्हणालेत. हाफियाच्या टेनियन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या टीमच्या प्रमुख याइर इन इली यांनी सांगतिलं, फक्त 30 मिनिटांतच या मास्कवरील कोरोनाव्हायरसचा नाश होईल. मात्र जेव्हा मास्क चार्जरला लावलेला असेल तेव्हा त्याचा वापर करू नये, असंही त्यांनी सांगितलं आहे. हे वाचा -  81 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लहर; WHO ने व्यक्त केली चिंता येरूशलमच्या हादसाह मेडिकल सेंटरमधील संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञ प्राध्यापक एलोन मोसेज म्हणाल्या की, अर्ध्या तासात 70 डिग्री तापमानावर कोरोनाव्हायरस मरेल मात्र पुन्हा पुन्हा गरम केल्याने मास्कचा पेपर किंवा कपडा गरम झाल्याने मास्कची संक्रमण रोखण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हे वाचा -  कोरोना ही शेवटची महासाथ नाही, पुढील आव्हानांसाठी तयार राहा; WHO ने केलं सावध इली म्हणाल्या, “टेस्टिंगदरम्यान प्रोटोटाइप मास्कला दर अर्ध्या तासांनी 20 वेळा गरम करण्यात आलं. मात्र मास्कवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे हा मास्क एका मर्यादित कालावधीपर्यंत पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतो” या मास्कसाठी पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हा मास्क बाजारात येईल. डिस्पोजेबल मास्कपेक्षा याची किंमत किंचित जास्त असेल असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या