मुंबई, 31 जुलै : कोणतेही नाते टिकवून ठेवण्यासाठी जोडीदारांमधील प्रेमासोबत एकमेकांचे काम आणि स्पेस यांचीही काळजी घेणे आवश्यक असते. परंतु बरेच लोक त्यांच्या जोडीदाराबद्दल आणि त्या नात्याबद्दल ओव्हर पझेसिव्ह बनतात. त्यानंतर त्यांच्यात समस्या निर्माण होऊ लागतात. कपलमधील एकाने दुसऱ्याच्या बाबतीत ओव्हर पझेसिव्ह झाल्यामुळे नातेसंबंधात अडचणी निर्माण होऊ शकतात. जी व्यक्ती ओव्हर पसेसिव्ह बनते ती आपल्या जोडीदारासोबत वेगळ्या पद्धतीने वागू लागते. जसे की प्रत्येक गोष्टीसाठी अडवणे, शंका घेणे आणि हजारो प्रश्न विचारणे. व्यक्तीची असुरक्षितता, भूतकाळातील वाईट अनुभव किंवा इतर कोणतेत्याही कारणांमुळे असू शकते. परंतु अतिप्रमाणात असणे हे कोणत्याही नात्यासाठी चांगले नाही. आज आपण ओव्हर पसेसिव्ह असण्याचे संकेत आणि बचावासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत. ओव्हर पझेसिव्ह असण्याचे संकेत - स्टाइलक्रेझनुसार, पार्टनरला इतर लोकांपासून वेगळे करणे हे ओव्हर पझेसिव्ह असण्याचे लक्षण आहे. असे केल्याने, त्यांना असे वाटू शकते की ते त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना किंवा इतर लोकांना वेळ देऊ शकत नाहीत. कारण त्यांचा जोडीदार त्यांना तो सर्व वेळ स्वतःसोबत घालवण्यास भाग पाडत आहे. तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडलाय का? `या` गोष्टींवरून होईल स्पष्ट - तुम्हाला असुरक्षित वाटते आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराला कोणासोबत पाहून हेवा वाटतो किंवा तुमच्या जोडीदाराने कोणालाही पाहिलेले तुम्हाला आवडत नाही. - तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल आवडणारी प्रत्येक गोष्ट जसे की त्यांची निवड, त्यांची राहण्याची पद्धत किंवा त्यांचे पैसे या सर्वांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्याबद्दल जास्त पझेसिव्ह आहात.
Relationship Tips : फार काळ धरणार नाही ‘ती’ अबोला; बायकोचा रुसवा चुटकीत दूर करण्याचा हा घ्या सोपा फंडाअशा वर्तनापासून बचाव - कपलने एकत्र वेळ घालवणे खूप महत्वाचे आहे. परंतु तुमचे छंद, नोकरी आणि सामाजिक जीवनात असणेदेखील खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व वेळ फक्त एका व्यक्तीला देणे टाळा आणि लक्षात ठेवा की कोणत्याही नात्यात तुम्ही आणि तुमचे प्राधान्यक्रम सर्वात महत्वाचे असतात. - असुरक्षित वाटणे टाळा. असुरक्षितता मत्सर आणि पझेसिव्हनेस यांना जन्म देते. मत्सर आणि पझेसिव्हनेस केवळ नातेसंबंधाचा नाश करत नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात द्वेष आणि कटुतादेखील आणतात. त्यामुळे तुम्ही ते टाळावे.