मुंबई, 19 ऑक्टोबर : दिवाळी आली म्हणजे वेगवेगळ्या गोड,तिखट पदार्थ बनवण्याची स्पर्धाच सुरु होते. प्रत्येकाच्या घरात चिवडा,लाडू, करंजी, चकली बनवली जाते. त्याचबरोबर या दिवाळी त काही नवा पदार्थ बनवता येईल का यासाठी प्रत्येक गृहिणी विचार करत असते. आज महाराष्ट्रासाठी नवीन असलेल्या लाडूची रेसिपी आम्ही सांगणार आहोत. तोंडात टाकला की जिभेवरच विरघळणारा हा लाडू आहे. आजपर्यंत तुम्ही कुठेच या लाडूची टेस्ट अनुभवली नसेल. ‘गुर्जरी रेसिपी’ या पुस्तकाच्या लेखिका माधवी पाटील यांनी ‘News18 लोकमत’ ला या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे. दळाचा लाडू बनवण्याचे प्रमाण तूप - एक वाटी बारीक रवा -एक वाटी **मैदा (पिठी) -**दीड वाटी **पिठी साखर -**दोन वाट्या दळाचा लाडू बनवण्याची कृती दळाचा लाडू बनवण्यासाठी फक्त चार पदार्थ लागतात, तूप, साखर, ओलवलेल्या गव्हाचा मैदा आणि रवा. सर्वप्रथम एका कढईत एक वाटी तूप कडकडीत तापवावे. गरम झालेल्या तुपात एक वाटी रवा मंद आचेवर हलका गुलाबी भाजावा. नंतर त्यात दीड वाटी मैदा टाकून तूप सुटेपर्यंत खमंग भाजावे नंतर पसरट परातीमध्ये काढून दोन दिवस झाकून ठेवावे. दोन दिवसानंतर भाजलेले मिश्रण हाताने खूप फेटून घ्यावे. छान तूप सुटल्यावर त्यात दोन वाटी पिठीसाखर मिसळून घ्यावी. ‘या’ हॉटेलमध्ये मिळते दिवाळी स्पेशल भाजणीची चकली, तब्बल 111 वर्षांची आहे परंपरा, Video सर्व पदार्थ भाजलेत का हे कसे ओळखावे? भाजत असताना वापरत असलेल्या चमच्यावर मिश्रण टिकत नसेल तर समजावे पूर्ण भाजून झालं आहे किंवा कढईच्या कडेवर ठोकल्यानंतर मिश्रणत बुडबुडे येत असतील तर समजावे मिश्रण भाजून झाले आहे. मंद आचेवर सुद्धा हे मिश्रण सतत परतवावे लागते कारण ते जळण्याची शक्यता असते. गहू कसे भिजवावे? 4-5 मिनिटे गहू पाण्यात भिजवावे त्यानंतर त्याला घरातच वाळवावे. (जास्त वाळवू नये.) दाताने कटकन तुटेल इतके वाळवावे आणि गिरणीत रव्यासाठी दळून घ्यावे. त्यानंतर त्याला गाळून रवा, मैदा वेगळा करावा आणि गव्हाचे साल (पत्ती) वेगळे करावे. Diwali 2022 : मुंबईतील चिवडा बाजारात काय आहे मस्त? पाहा VIDEO हा लाडू किती दिवस टिकतो? 6 महिने टिकणारी ही एकमेव मिठाई आहे. या लाडूचे भाजलेले मिश्रण फ्रिज मध्ये ठेवून जेव्हा वाटेल तेव्हा त्यात साखर मिसळून तुम्ही खाऊ शकता. खरं तर हा लाडू नेहमीच्या लाडूसारखा दिसत नाही. त्याला आईसक्रीमच्या स्कूपसारखे प्लेटमध्ये घ्यावे लागते. यात जर तुपाचे प्रमाण थोडे कमी असले तर मात्र याचा गोल लाडू बनतो. पण याला खाण्याची पारंपारिक पद्धत म्हणजे स्कूपनेच प्लेट मध्ये घेऊन खाणे आहे. आरोग्यासाठी पौष्टिक लाडू असतो. घरी कुणी पाहुणे आले तर त्यांच्या सरबराईसाठीही हा शाही लाडू मानला जातो.