JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात जीवघेण्या विजा आणि वादळापासून असे करा स्वतःचे रक्षण, फॉलो करा या टिप्स

पावसाळ्यात जीवघेण्या विजा आणि वादळापासून असे करा स्वतःचे रक्षण, फॉलो करा या टिप्स

नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी (NDMA) ने अलीकडेच वीजा आणि वाळूच्या वादळाच्या वेळी सुरक्षित कसे राहायचे याबद्दल काही उपाय सांगितले आहेत. देशातील बहुतेक भागांमध्ये आता मान्सून सुरु झाला आहेत आणि अनेक राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जुलै : पावसाळ्यात गडगडणारे ढग आणि वादळांमुळे अनेकदा पाळीव प्राणी, पिके आणि वाहनांचे गंभीर नुकसान होते. NDMA ने (National Disaster Management Authority) नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये संभाव्य वादळ (Sandstorms) आणि विजांसाठी (Thunderstorm) तयार राहण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. वादळ येण्यापूर्वीची तयारी, वादळाच्या वेळी विचारात घ्यायच्या उपाययोजना (Monsoon Tips) आणि वादळानंतर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. https://twitter.com/ndmaindia/status/1544155103443181568 वादळापूर्वी करा अशी तयारी - जगण्यासाठी आवश्यक वस्तू आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक वस्तू असणारी एक आपत्कालीन किट तयार करा. - घराची दुरुस्ती करून घ्या आणि तुमचे घर सुरक्षित करा. - टीव्ही चॅनेल आणि रेडिओवरील ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवा. Stomach Infection: पोटात इन्फेक्शन होतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात; दुर्लक्ष करणं महागात पडेल https://twitter.com/ndmaindia/status/1544162401146138624 वादळ आल्यावर लक्षात ठेवा या गोष्टी - घराच्या आत राहा. व्हरांड्यात किंवा बाल्कनीपासून दूर राहा. - विद्युत उपकरणे जसे की टीव्ही, फ्रिज हे बंद करा आणि लँडलाईन फोनचा वापर टाळा. - वाहते पाणी वापरू नका आणि धातूच्या पाईपपासून दूर रहा. - तुम्ही बस किंवा कारमध्ये असल्यास तिथेच थांबा. - झाडाखाली किंवा झाडाजवळ थांबू घेऊ नका. वीज तारांपासून दूर राहा. - कोणत्याही धातूच्या वस्तू वापरू नका. Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम https://twitter.com/ndmaindia/status/1544169951086403585 वादळ गेल्यावर करा या गोष्टी - वादळामुळे नुकसान झालेल्या भागापासून दूर राहा. - वृद्ध, मुले आणि दिव्यांगांना मदत करा - पडलेल्या झाडांपासून किंवा वीजवाहिन्यांपासून दूर राहा आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या