JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / VIDEO - जंगलात असं काही घडलं की जंगलाच्या राजाचीही झोप उडाली; पाहताच भरली धडकी

VIDEO - जंगलात असं काही घडलं की जंगलाच्या राजाचीही झोप उडाली; पाहताच भरली धडकी

सिंहांना (Lion) असं तुम्ही कदाचित कधीच पाहिलं नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 एप्रिल : सिंह (Lion) म्हणजे जंगलाचा राजा. जो कुणालाही घाबरत नाही. सिंह (Lion video) म्हटलं तरी माणसांना तर घाम फुटतोच पण कित्येक प्राणीही त्याला घाबरतात. सिंहाशी पंगा घेण्याचा प्रयत्न तसा सहसा कुणी करत नाही. पण कधी सिंहाला घाबरलेलं तुम्ही पाहिलं का? नाही ना. अशाच घाबरलेल्या सिंहांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एक सिंह आणि दोन सिंहिणी झाडाखाली शांत झोपले आहेत. तेव्हा अचानक असं काही होतं की तिघंही खडबडून जागे होतात तिघांचीही झोप उडते. आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता जंगलाचा राजा आपल्या दोन जोडीदारांसह छान आराम करतो आहे. एका झाडाच्या सावलीखाली तिघंही निवांत झोपले आहेत. इतक्यात दुसऱ्या बाजूने एक डुक्कर पळत येतो. तो इतक्या वेगाने येतो की तिन्ही सिंहांची झोपच उडते. ते ताडकन जागे होऊन उभे राहतात. डुक्कर त्यांच्याच दिशेनं पळत असतो. पण त्यालाही कल्पना नसते की तिथं सिंह आहेत. त्यांना पाहून तो आपला मार्ग बदलो आणि दुसऱ्या दिशेने पळत जातो. हे वाचा -  शेवटी ते छावेच! आपल्यापासून दूर पळणाऱ्या सिंहाचा पिल्लांनी पाठलाग केला आणि… सिंहांच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी पाहण्यासारखे आहेत. ते थोडे घाबरलेल्या अवस्थेतच दिसत आहेत. नेमकं घडलं तरी काय हे त्यांनाही समजलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नांकित भाव स्पष्टपणे दिसतो आहे. पण काही असो सिंहांना तुम्ही असं कदाचित कधीच पाहिलं नसावं. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या