नवी दिल्ली, 21 एप्रिल : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोणती लस (Corona Vaccine) अधिक प्रभावी असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. जागतिक स्तरावर मॉडर्ना (Moderna corona vaccine) आणि फायझर (Pfizer corona vaccine) या लशींची तुलना होत आहे. तज्ज्ञ फायझरची (Pfizer) लस अधिक प्रभावी असल्याचे मानत आहेत. mRNAतंत्रावर आधारित काम करणाऱ्या फायझरच्या लशीचे दोन्ही डोस घेतले तर ती 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरू शकते. फायझर लस कशी काम करते**?** या लशीच्या माध्यमातून मानवी शरीरात mRNA सोडले जातात. हे एक जनेटिक मटेरियल (Genetic Material)असून ते शरीरातील पेशींना विषाणूचं प्रोटिन (Virus Protin)ओळखण्यास मदत करतात आणि सक्रिय होतात. जर विषाणूचा संसर्ग झाला तर अँटिबॉडी (Antibody) कशा तयार करायच्या हे ते शरीराला शिकवते. विषाणूने (Virus) हल्ला केल्यानंतर शरीरातील पेशी तो ओळखतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते. कोणत्या वयोगटातील लोकांना फायझरची लस दिली जाते**?** वय वर्ष 16 वरील सर्व वयोगटातील लोकांना देता येणारी ही एकमेव लस आहे. मॉडर्ना (Moderna) तसंच भारतात उत्पादित लशी या 18 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांनाच घेता येतात. याचाच अर्थ असा की फायझरची लस मोठ्या लोकसंख्येला उपयुक्त ठरू शकते. फायझर लशीची कार्यक्षमता कशी आहे**?** याबाबत सातत्यानं संशोधन सुरू आहे. Statenews.com च्या वृत्तानुसार,फायझर लशीची कार्यक्षमता 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत मॉडर्ना लशीचा परिणाम 94.1 टक्के होताना दिसतो. फायझर लशीचे साईड इफेक्ट कोणते**?** क्लिनिकल ट्रायल (Clinical Trial) दरम्यान या लशीचे डोकेदुखी, लस घेतलेल्या ठिकाणी दुखणं किंवा लाल होणं, सूज येणं असे साईड इफेक्ट (Side Effect) दिसून आले आहेत. जवळपास 3.8 टक्के लोकांनी ही लस घेतल्यानंतर थकवा आल्याची तक्रार केली. हे वाचा - कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार! दोन नाही तर फक्त एकच डोस घ्यावा लागणार त्या तुलनेत मॉडर्नाची लस घेतल्यानंतर 9.7 टक्के लोकांनी तक्रारी केल्या. याचाच अर्थ अल्पकालीन साईड इफेक्टमध्येही फायझरची लस प्रभावी असल्याचं दिसून येतं. फायझर लशीची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे आणि ती किती मोठी आहे**?** फायझरही जगातील सर्वाच मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी एक असून अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी (American Multinational Company) आहे. सुमारे 47.644 अब्ज डॉलर सह 2020 मध्ये फॉर्च्युन 500 च्या यादीत या कंपनीला 64 वे स्थान मिळाले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय मॅनहॅटनमध्ये आहे. फायझर कंपनी विषाणूजन्य आजारांव्यतरिक्त आणखी कशावर काम करते**?** याची यादी मोठी आहे. या यादीनुसार केवळ इम्युनोलॉजीच नाही तर कॅन्सर, इंडोक्रिइनोलॉजी, न्यूरो सायन्सवर संशोधन आणि औषध तयार करण्याचे काम ही कंपनी करते. तसंच मानसिक आजारांवर देखील औषधनिर्मिती करण्यावर कंपनीचा भर आहे. फायझरचा इतिहास काय आहे. कोणी रचला होता पाया**?** सन 1849 मध्ये जर्मन स्थलांतरित चा्र्ल्स फायझर आणि त्यांचा भाऊ चार्ल्स एफ. आर्हर्ट यांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरू केली. तेव्हा कंपनीचे कार्यालय न्यूयॉर्कमध्ये होते आणि कंपनी रसायनविषयक व्यवसाय करत होती. अचानक कंपनीला परजीवी अमिबामुळे होणाऱ्या पोटदुखीच्या आजारावर औषध तयार करण्यात यश मिळालं त्यानंतर कंपनीने रसायनविषयक व्यवसाय सोडून पूर्णवेळ आजारांवर संशोधन करून औषधं, लशी बनवण्यावर भर दिला. हे वाचा - भारतात कोरोना लशींचा अपव्यय; मोठ्या प्रमाणात लशींचे डोस वाया पहिल्या महायुद्धानंतर संसर्गजन्य आजारांचा फैलाव वाढल्यानंतर कंपनीत क्रांतिकारक बदल झाले. ही कंपनी अन्य देशांकडून औषधं घेण्याऐवजी स्वतःच पर्याय शोधू लागली आणि त्यांची निर्मिती करू लागली. त्यानंतर फायझर कंपनी सातत्याने प्रगतीपथावर आहे. फायझरची लस भारतात येणार का**?** याबाबत पक्कं सांगता येत नाही. अमेरिकी फार्मा कंपनी फायझरने यापूर्वीच भारतात (India) आपत्कालीन वापरासाठी लशीला परवानगी द्यावी यासाठी अर्ज केला आहे. परंतू जानेवारीत हा अर्ज मागे घेण्यात आला. याचं कारण बॉण्ड असून यावर आपल्या सरकारने मंजुरी दिली नाही. या लशीमुळे लोकांमध्ये साईड इफेक्ट दिसून आले तर कंपनीवर कारवाई करू नये, अशी मागणी कंपनीने केली आहे. अतिथंड तापमानात सुरक्षित राहणारी ही लस भारतात कशी साठवली जाणार**?** भारतातील मोठ्या लोकसंख्येचे वेगात लसीकरण व्हावं यासाठी स्वदेशी लशीबरोबरच फायझरविषयीही चर्चा होत आहे. परंतु प्रश्न असा आहे की -70 डिग्री तापमानात स्टोअर केली जाणारी ही लस भारतात कशा पद्धतीनं साठवली जाणार. याबाबत फायझरने फॅक्टशीटमध्ये सांगितल्यानुसार, यासाठी आम्ही एका विशिष्ट बॉक्सचा वापर करतो. हा थर्मल बॉक्स आहे. यात तापमान कंट्रोल केलं जाऊ शकतं. या बॉक्समध्ये तापमान मोजण्याचं डिव्हाईस बसवण्यात आलं आहे. यामुळे कोणतीही गडबड होण्याची शक्यता नाही.