मुंबई, 11 नोव्हेंबर : स्मरणशक्तीबद्दल बोलायचं झालं की, आपल्या डोक्यात सर्वप्रथम विचार येतो म्हणजे बदामाचा. बदाम खाल्यान्ने स्मरणशक्ती वाढते हे सर्वानाच माहित आहे. परंतु हे बदाम सर्वानाच परवडतात असे नाही. शिवाय काही लोकांना ते खायलादेखील आवडत नाही. मग आपली स्मरणशक्ती सुधारण्यासाठी दुसरा पर्याय काय? तर पर्याय अगदी सोपा आणि स्वस्त आहे. शेंगदाणे… होय, शेंगदाणे खाण्याचे फायदे आहेत. शेंगदाणे स्मरणशक्ती तर वाढवतातच. शिवाय वयानुसार होणाऱ्या मानसिक आजारांवर मात करण्यासाठीही मदत करतात. शेंगदाण्यांमध्ये आढळणारे मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडसारखे विशेष घटक खराब कोलेस्ट्रॉलला प्रतिबंध करतात. शेंगदाणे हृदयविकाराचा धोकादेखील कमी करतात. ते केवळ अति ऊर्जा देणारेच नाहीत तर प्रोटीननेही भरपूर आहेत. चाला तर मग पाहुयात शेंगदाणे खाण्याचे काय काय फायदे आहेत आणि ते किती प्रमाणात खावे.
नावावर जाऊ नका, खूप फायद्याचे असतात ढेमसे; Weight Loss पासून BP पर्यंत अनेक समस्या करतं दूरशेंगदाणे खाण्याचे इतर फायदे निरोगी हृदय : कार्डिओ-संरक्षणात्मक गुणधर्म शेंगदाण्यात आढळतात. अशा परिस्थितीत जे लोक नियमितपणे शेंगदाणे खातात. त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. हे कोलेस्ट्रॉल सुधारते आणि रक्ताच्या लहान गुठळ्या होण्याच्या समस्येस प्रतिबंध करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत नाही.
निरोगी मेंदू : ओमेगा-3 फॅटी अॅसिड शेंगदाण्यामध्ये आढळते. हे असे फॅटी ऍसिड आहे जे मेंदूची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. अशा स्थितीत मुलांना रोज सकाळी नाश्त्यामध्ये नियमितपणे भिजवलेले शेंगदाणे खायला द्यावे. त्वचेसाठी चांगले : शेंगदाण्यात अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे त्वचेला वृद्धत्वापासून वाचवतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. बॉडी बिल्डिंगसाठी फायदेशीर : जे बॉडी बिल्डिंग करतात त्यांनी रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर ठरते. यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते : यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित काम करते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर राहतात. शेंगदाणे किती प्रमाणात खावे? युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने ४८२२ चिनी प्रौढांवर एक अभ्यास केला. नंतरच्या विद्यापीठातील प्रमुख संशोधक मिंग ली यांनी सांगितले की, “दररोज 10 ग्रॅम किंवा दोन चमचे शेंगदाणे खाल्ल्याने वृद्ध लोक त्यांच्या संज्ञानात्मक कार्यामध्ये 60 टक्क्यांपर्यंत सुधारणा करू शकतात. जे शेंगदाणे खात नाहीत त्यांच्या तुलनेत शेंगदाणे खाणाऱ्या लोकांच्या स्मरणशक्तीमध्ये खूप सुधारणा असते.” त्यामुळे शेंगदाणे तुमच्या स्मरणशक्तीची उपयुक्त अस्तततच. मात्र त्यांचे सेवन प्रमाणातच करायला हवे. Fatty Liver Disease : …तर दारू न पिताही तुमचं लिव्हर होतं खराब; दिसतात अशी लक्षणं जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्यास काय होते? आवश्यकतेपेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ल्याने विपरित परिणाम होऊ शकतात. वजन वाढणे किंवा ऍलर्जीचा धोका वाढू शकतो. कारण शेंगदाण्यांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो ऍसिड असते. मात्र शेंगदाणे प्रमाणात खाल्यास हे ट्रिप्टोफॅन तुमचा मूड पॉझिटिव्ह ठेवण्यात आणि नैराश्य दूर ठेवण्यास देखील मदत करते. त्यात असलेले तेल तुमच्या केसांची वाढ सुधारण्यासाठी पुरेसे आहे. शेंगदाण्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही ते सॅलडसोबत खावे.