मुंबई, 20 जून : ऑफिसला जाण्यासाठी बहुतेक लोकांना फॉर्मल स्टाइल (Office Dressing style) फॉलो करावी लागते. अर्थातच फॉर्मल ड्रेस (Formal Dress) व्यक्तिमत्व वाढवण्यासोबतच आत्मविश्वास वाढवण्याचे कामही करतात. पंरतु तरीही अनेकांना ऑफिस ड्रेसमध्ये आरामदायक वाटत नाही. अशा परिस्थितीत लोकांना स्टाइल आणि कम्फर्ट यापैकी एकाची निवड करावी (Dressing Style For Office) लागते. मात्र काही टिप्स फॉलो करून तुम्ही स्टाईल आणि कम्फर्ट (Style And Comfort) एकत्र कॅरी करू शकता. ऑफिसला जाताना कोणती ड्रेसिंग स्टाईल (Perfect Dressing Style For Office) असावी याबाबत अनेकदा लोक गोंधळलेले असतात. ऑफिसमध्ये परफेक्ट ड्रेसिंग सेन्स (Dressing Sense) तुम्हाला सुंदर बनवण्यासोबतच तुमचे मनोबल देखील वाढवण्याचे काम करते. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत ऑफिस ड्रेसिंगच्या (Office Dressing Tips) काही टिप्स शेअर करत आहोत. हे ट्राय करून तुम्ही सहज आरामदायक आणि स्मार्ट लुक (Smart Look) मिळवू शकता.
Photo Gallery : गेल्या जन्माच्या चांगल्या कर्मांमुळेच वर्तमानात मिळतात ‘या’ गोष्टी, काय सांगते आर्य चाणक्य नीती?कॅज्युअल कपडे घालणे शक्यतो टाळा आरामाला महत्त्व देणारे बरेच लोक फक्त कॅज्युअल वेअरमध्येच ऑफिसला जाणे पसंत करतात. कधी-कधी कॅज्युअल लूकमध्ये ऑफिसला जाण्यात काही गैर नाही. परंतु दररोज कॅज्युअल पोशाख परिधान केल्याने तुमची कामाप्रती निष्काळजीपणा दिसू शकतो आणि लोक तुम्हाला ऑफिसमध्ये गांभीर्याने घेणे थांबवू शकतात. त्यामुळे कॅज्युअल परिधान करून ऑफिसला जाणे टाळावे. फिटिंग असलेले कपडे घाला ऑफिसला जाताना अगदी सैल आणि टाइट कपडे परिधान केल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी योग्य फिटिंग असलेले कपडे घालणे चांगले. तसेच इतरांच्या स्टाईल सेन्सला फॉलो न करता तुमच्या सोयीनुसार ड्रेस निवडण्याचा प्रयत्न करा.
Hotel Booking: ट्रिपला जाण्यापूर्वी हॉटेल बुक करताय? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजीकपड्यांमुळे वाढेल आत्मविश्वास ऑफिसला जाण्यासाठी तुमचे आवडते कपडे घाला. लोक सहसा त्यांचा आवडता ड्रेस परिधान करून आत्मविश्वास अनुभवतात. अशा स्थितीत तुमच्या आत्मविश्वासाचा कामावरही चांगला परिणाम होतो. फुटवेअरकडे दूर्लक्ष करू नका ऑफिसला जाण्यासाठी लोक कपड्यांकडे जास्त लक्ष देताना दिसतात. परंतू अनेक जण फूटवेअरकडे दूर्लक्ष करतात. विशेषतः ऑफिसमध्ये आरामदायी फुटवेअर घालणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे ऑफिससाठी ड्रेसशी मॅचिंग असलेले चांगल्या ब्रँडचे पादत्राणे घेऊन जाण्यास विसरू नका.