मुंबई, 16 डिसेंबर : आपल्या घरांमध्ये अनेक निरुपयोगी वस्तू असतात आणि त्या आपण कचऱ्यात फेकून देतो किंवा अडगळीत टाकून देतो. परंतु अशा निरोपयोगी वस्तूंचा तुम्ही घरांमध्ये अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करू शकता. टाकाऊ गोष्टींमध्ये दररोज घरात येणाऱ्या वर्तमानपत्रांचा देखील समावेश असतो. बऱ्याच घरांमध्ये जुन्या वर्तमानपत्रांचे ढिग असतात. याच वर्तमान पत्रांचा तुम्ही क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करून ते पुन्हा वापरात आणू शकतात. तुम्हालाही घरात पडलेल्या जुन्या वर्तमानपत्रांचा योग्य पद्धतीने उपयोग करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्कृष्ट आणि सर्जनशील कल्पना घेऊन आलो आहोत. या आयडिया वापरून तुम्ही तुमच्या घराजवळील बागेत या वर्तमानपत्रांचा उत्तमरित्या वापर करू शकता. तुम्हाला बागकामाची आवड असेल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत.
अनेक तास एकाच जागी बसून काम करताय? मग हे एकदा वाचाचअशा प्रकारे बागेत वापरा वर्तमानपत्र कंपोस्ट म्हणून वापरा हे तुम्हाला थोडं विचित्र वाटू शखते, पण जुनी आणि खराब झालेली वर्तमानपत्रे कंपोस्ट म्हणून वापरली जाऊ शकतात. आपण वर्तमानपत्रांचे लहान तुकडे करू शकता आणि ते कोणत्याही कंपोस्टमध्ये घालू शकता. अशाप्रकारे वर्तमानपत्र वापरल्याने कंपोस्ट चांगले बनते आणि त्यातून येणारा वासही कमी होतो.
झाडाला अतिरिक्त पाणी शोषण्यास करते मदत जास्त पाणी दिल्याने अनेकदा झाडे खराब होतात किंवा कोमेजून जातात. परंतु आता असे होणार नाही. झाडांना चुकून जास्त पाणी दिले गेले असेल तर तुम्ही काही जुनी वर्तमानपत्रे घेऊन रोपांच्या मुळाशी ठेऊ शकता. असे केल्याने सर्व अतिरिक्त पाणी वर्तमानपत्रात शोसले जाईल आणि झाडांना नुकसाना होणार नाही. झाडांना थंडीपासून वाचवण्यासाठी उपयुक्त कधी कधी थंडी खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे झाडांवर परिणाम होऊ लागतो. अशा परिस्थितीत झाडांना थंडी आणि धुक्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही वर्तमानपत्राचा उत्तम वापर करू शकता. तुम्ही झाडाभोवती वर्तमानपत्रे गुंडाळून त्यांना अशा वातावरणात सुरक्षित ठेऊ शकता. Brest Cancer : ब्रेस्ट कॅन्सरवर 1 रुपयात प्रभावी उपचार; कुठे? जाणून घ्या बियांचे पक्ष्यांपासून संरक्षण करा अनेकदा बागेत किंवा गच्चीवर रोप लावण्यासाठी पेरलेल्या बिया पक्षी येऊन खातात किंवा खराब करू शकतात. अशा परिस्थितीत पक्ष्यांपासून बियांचे संरक्षण करण्यासाठी, बिया पेरल्यानंतर त्यावर वर्तमानपत्र पसरवू शकता. असे केल्याने बियांचे संरक्षण होईल.