नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : कधीकधी आपण बराच वेळ एकाच जागी बसून राहतो, त्याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता तर बळावतेच, शिवाय एनर्जी जास्त काळ खर्च होत असल्याने शरीराला झपाट्याने वृद्धत्व येऊ लागतं. अमेरिकन जर्नल ऑफ प्रीव्हेंटिव्ह मेडिसिनच्या मते, एकाच जागी जास्त वेळ बसल्याने डायबेटिज आणि हृदयासंबंधित आजार होऊ शकतात. तर, जर्नल ऑफ लाईफस्टाईल मेडिसिननुसार, 6 ते 8 तास एकाच जागी बसून काम केल्यानंतर हायपरटेन्शन आणि मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डरची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे शरीरावर वृद्धत्वाची लक्षणं आणखी तीव्र होतात. संशोधन काय सांगतं? मायोक्लिनिकच्या मते, जर एखादी व्यक्ती एकाच ठिकाणी 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम करत असेल, तेही कोणत्याही शारीरिक हालचालींशिवाय, तर ते धूम्रपान आणि लठ्ठपणाइतकंच धोकादायक आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीला असं आढळून आलंय, की दररोज 60-75 मिनिटे वेगाने चालणं किंवा सायकल चालवणं, असा मध्यम व्यायाम केल्यास वृद्धत्वाचे परिणाम कमी करता येऊ शकतात. तसंच यामुळे अकाली मृत्यूचा वाढलेला धोका दूर केला जाऊ शकतो. हेही वाचा - Brest Cancer : ब्रेस्ट कॅन्सरवर 1 रुपयात प्रभावी उपचार; कुठे? जाणून घ्या शरीराला अशा प्रकारे ठेवू शकता अॅक्टिव्ह सायकलिंग किंवा वॉकिंगसाठी वेळ काढणं प्रत्येकाला जमत नाही. अशा स्थितीत ऑफिसमध्ये काम करताना किंवा घरी काम करताना रोज सकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारल्यास शरीरावरील वृद्धत्वाची लक्षणं नियंत्रित करता येतात. याशिवाय लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर केल्यास ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल, तर उठून स्वतःच घ्या. कामाच्यादरम्यान शरीराची हालचाल ठेवा, एकाच जागी बसून राहू नका. काम करताना शरीराची हालचाल करण्यासाठी कोणत्या गोष्टी करता येतील? - काम करत असताना दर अर्ध्या तासाने ब्रेक घ्या. - उभं राहून किंवा चालत चालत फोनवर बोला. - मीटिंग खुर्चीवर बसण्याऐवजी थोडं फिरून किंवा उभे राहून करा. - घरी ट्रेडमिल वापरा. - रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करा. - जेवणानंतर थोडा वेळ काढून फिरा. - आपली कामं स्वतः करा, शरीराची हालचाल वाढेल, अशी कामं करा. या गोष्टी करून तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल वाढवू शकता. त्यामुळे तुमच्या शरीराबरोबरच तुमचं मनही चांगलं तंदुरुस्त राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.