अॅम्स्टरडॅम, 20 ऑक्टोबर : मूल कसंही असलं तरी ते आई-वडिलांना प्रिय असतं. मात्र तरी त्याला एखादा असा आजार झाला ज्यावर उपचार नाहीत आणि त्याचा खूप त्रास होतो, तर अशावेळी पालकांना मुलाचे हाल पाहवत नाही. त्यामुळेच अशा मुलांचं आयुष्य संपवण्याची मागणी होऊ लागली. ज्याबाबत नेदरलँडच्या (netherland) आरोग्यमंत्र्यांनी संसदेत प्रस्ताव ठेवला आहे. नेदरलँडमध्ये उपचार नसलेल्या आजारांनी पीडित अशा एक वर्षापेक्षा कमी आणि 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मृत्यू देण्याची तरतूद आहे. मात्र 1 ते 12 वयोगटासाठी हा कायदा लागू नव्हता. त्यामुळे या काद्यातल बदल करण्याची मागणी जोर धरली. याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 1 ते 12 वयोगटातही गंभीर आणि उपचार नसलेल्या आजारांनी ग्रस्त मुलांचं आयुष्य संपवलं परवानगी द्यावी, असा हा प्रस्ताव आहे. डॉक्टर पालकांच्या संमतीनेच मुलांचं आयुष्य संपवतील. यामुळे त्या मुलाचा आणि कुटुंबाचा त्रास कमी करता येऊ शकतो, असा दावा केला जातो आहे. हे वाचा - आई व्हायचंय! वयाच्या कोणत्या टप्प्यावर हा निर्णय घेणं योग्य? न्यूयॉर्क टाइम्स च्या वृत्तानुसार नेदरलँडचे आरोग्यमंत्री डी. जाँग यांनी संसदेत मृत्यूसंबंधी कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव संसदेत ठेवला. उपचार नसलेल्या आजारांनी ग्रस्त असलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाला त्याच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार मृत्यू देण्यासंबंधी हा प्रस्ताव. अशा आजारांमुळे आई-वडिलांना, भावनिक, मानसिक, आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. पण यासाठी आई-वडिलांची परवानगी बंधकारक असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. हे वाचा - बापरे! लग्नासाठी विचित्र परीक्षा; थेट Whale च्या जबड्यात घालावा लागतो हात ट्री बार्क डिसॉर्डर, कशिंग सिंड्रोम, न्युरोफाइब्रोमॅटोसिससारखे काही आजार आहेत, ज्यांच्यावर आजही उपचार नाही. काही आजारांवर उपचार आहेत, मात्र ते इतके महागडे आहेत, की सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत.