JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या गोष्टी सोमवारी न चुकता कराव्या; धन-धान्याची घरात कधी नाही भासणार कमतरता

या गोष्टी सोमवारी न चुकता कराव्या; धन-धान्याची घरात कधी नाही भासणार कमतरता

हिंदू धर्मात असं मानलं जातं की, आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व असतं. आठवड्यातील या वेगवेगळ्या दिवशी केलेल्या कामाचं फळ माणसाला त्याच्या आयुष्यात मिळतं. धार्मिक शास्त्रांमध्ये सोमवारी धनप्राप्तीबाबत काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मे : स्वतःचं आणि कुटुंबाचं जीवन सुखी होण्यासाठी लोक खूप कष्ट करून पैसे जमा करतात. पण अनेक वेळा अथक परिश्रम करूनही लोकांच्या पैशासंबंधीच्या अडचणी दूर होत नाहीत. हिंदू धर्मात असं मानलं जातं की, आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व असतं. आठवड्यातील या वेगवेगळ्या दिवशी केलेल्या कामाचं फळ माणसाला त्याच्या आयुष्यात मिळतं. धार्मिक शास्त्रांमध्ये सोमवारी धनप्राप्तीबाबत काही खास उपाय सांगण्यात आले आहेत., त्याबद्दल भोपाळचे पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितलेले ज्योतिष शास्त्र उपाय जाणून (Somvar che Upay) घेऊया. समृद्धीसाठी उपाय - सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे. असे मानले जाते की सोमवारी भगवान शंकराची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. निर्धारित वेळेत नियमितपणे भगवान शिवाची पूजा केल्याने, भोलेनाथ आपल्या भक्तांना अपार सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. हे वाचा -  जर अशी लक्षणं दिसत नसतील तर नॉर्मल नाहीये तुमची मासिक पाळी! पैशाच्या समस्यांसाठी - अथक परिश्रम करूनही धनसंचय होत नसेल तर सोमवारी रात्री शिवलिंगावर तुपाचा दिवा लावा. तुम्हाला हे 41 दिवस नियमित करावे लागेल. असे केल्याने शिवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. नोकरीच्या यशासाठी - भगवान शिवाला भोलेनाथ असेही म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्याच्या यशासाठी प्रामाणिक मनाने भगवान भोलेनाथांची प्रार्थना केली आणि शिवलिंगाला बेलची पाने, धतुरा, दूध आणि पाण्याने अभिषेक केला तर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्याला कार्यात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देतात. नोकरी किंवा व्यवसायात व्यत्यय - सोमवारी शिवलिंगावर भगवान शंकराला मधाची धारा अर्पण केल्यास भगवान शिव व्यक्तीच्या नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर करतात आणि त्याला प्रगतीचा आशीर्वाद देतात. हे वाचा -  चेहऱ्यावर हळद लावत असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवा; नंतर साईड इफेक्ट वाढतात पितृ दोष घालवण्यासाठी - काही लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असल्यामुळे त्यांची प्रगती थांबते किंवा त्यांना व्यवसायात लाभ होत नाही. अशा स्थितीत सोमवारी संपूर्ण अक्षता (धान्य) आणि काळे तीळ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. असे केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या