JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Period Blood On Skin : स्किन केअरसाठी पिरियड ब्लडचा वापर! पाहा सोशल मीडिया ट्रेंड किती सुरक्षित?

Period Blood On Skin : स्किन केअरसाठी पिरियड ब्लडचा वापर! पाहा सोशल मीडिया ट्रेंड किती सुरक्षित?

दिवाळी आता अगदी तोंडावर आलेली असताताना सोशल मीडियावर ब्युटी टिप्स संबंधित एक विचित्र ट्रेंड व्हायरल होत आहे. हा ट्रेंड आहे, ब्युटी फेशियलमध्ये मासिक पाळीचे रक्त वापरण्याचा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑक्टोबर : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काहीही अंदाज नसतो. काहीवेळा ही माहिती सुरक्षित आणि अधिकृत असते. मात्र बऱ्याचदा सोशल मीडियावरील माहितीवर किती विश्वास ठेवावा. याबद्दल शंकाच असते. त्यामुळे लोक अशा माहितीला फारसे गंभीरपणे घेत नाही. मात्र दिवाळी आता अगदी तोंडावर आलेली असताताना सोशल मीडियावर ब्युटी टिप्स संबंधित एक विचित्र ट्रेंड व्हायरल होत आहे. ब्युटी फेशियलमध्ये मासिक पाळीच्या रक्ताचा वापर कारण्याबाबत हा एक ट्रेंड आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. हे आपल्याला खूप विचित्र आणि घाणेरडे वाटत असेल मात्र अनेक TikTok युजर्सने त्वचेच्या फायद्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हे रक्त वापरल्याचा दावा केला आहे. मात्र खर्च हे रक्त आपल्या त्वचेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.

Period Rashes : पिरीएड्सदरम्यान रॅशेस का होतात? पाहा याची कारणं आणि उपाय

The Indian Express मध्ये दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकच्या एका युजरने सांगितले की, ‘पीरियड ब्लडमध्ये सर्व स्टेम सेल्स आणि सर्व पोषक घटक असतात ज्यांची बाळाला गरज असते आणि अर्थातच, तुमच्या त्वचेला आणि शरीराला आवश्यकता असते.’ मात्र हे खरंच सत्य आहे का? इंस्टाग्रामवर डॉक्टर गीतिका मित्तल गुप्ता यांनी याबद्दल सविस्तर माहिती शेअर केली आहे.

डॉक्टर गीतिका यांनी लिहिले, ‘फेशियलसाठी मासिक पाळीचे रक्त वापरणे हा अलीकडील स्किनकेअर ट्रेंड आहे. लोकांचा असा विश्वास आहे की पीरियड रक्त त्यांच्या त्वचेचे पोषण करते, मुरुम साफ करते आणि त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. परंतु हे खरे नाही आणि त्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.’ त्यांनी पुढे हेदेखील स्पष्ट केले की, मासिक पाळीचे रक्त वास्तविक संक्रमणास कारणीभूत ठरू शकते. कारण ते त्वचेच्या मृत पेशी आणि एंडोमिशिअम म्हणून ओळखल्या जाणार्‍या आतील मृत अस्तरामुळे दूषित म्हणजेच कन्टामिनेटेड झालेले असते. सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना महिलांनी ‘या’ चुका करणं टाळा, नाहीतर होईल मोठं नुकसान गीतिका यांनी हेदेखील सांगितले की, अनेकजणांचे प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (PRP) उपचार पद्धती आणि पीरियड ब्लड यांच्याबद्दल संभ्रमात आहे. खरं तर प्लेटलेट-रिच प्लाझ्मा हा एक क्लिनिकल उपचार आहे, जो वाढीच्या घटकांनी समृद्ध आहे, यामुळे त्वचा टवटवीत होते आणि जखमा असल्यास त्यादेखील बऱ्या होतात. मात्र काही गैसमजांमुळे आणि अयोग्य माहितीमुळे मासिक पाळीचे रक्त चेहऱ्यावर वापरण्याचा विचित्र ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

त्यामुळे सोशल मीडियावरील कोणताही ट्रेंड फॉलो करताना त्याची सत्यता पडताळून घ्या आणि कोणत्याही प्रकारचे उपचार किंवा सामग्री स्वतःवर वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या