मुंबई, 13 ऑक्टोबर : लैंगिक जागरूकता आणि शिक्षण काळाची गरज बनले आहे. परंतु अनेक भारतीय घरांमध्ये या विषयावर बोलणे हे लाजिरवाणी बाब मानली जाते. परिणामी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. लैंगिक आरोग्याच्या समस्या हाताळणाऱ्या किंवा लैंगिकतेबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न करणारे बहुतांश लोक हे पडताळणी न केलेल्या ऑनलाइन स्रोतांवर अवलंबून राहतात आणि तिच माहिती खरी मानतात किंवा त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या अवैज्ञानिक सल्ल्याचे पालन करतात. याविषीय नेमकी आणि तज्ञांनी दिलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा आमचा उद्देश आहे. हा लेख सेक्सोलॉजिस्ट प्रोफेसर डॉ. सरांश जैन यांनी लिहिला आहे. आजच्या लेखात डॉ जैन यांनी अल्कोहोलचा तुमच्या सेक्स ड्राइव्हवर कसा परिणाम होऊ शखके याबाबत सांगितले आहे. अल्कोहोल तुमच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकते. अल्कोहोलचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने मूड खराब होणे, लैंगिक इच्छा कमी होणे आणि त्याच्या प्रभावाखाली असताना पुरुषांना ताठरता प्राप्त करण्यास किंवा ऑर्गॅजम प्राप्त करणे कठीण होऊ शकते. दररोज जास्त अल्कोहोल घेतल्यास लैंगिक संबंधांसह लैगिंक अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. परंतु काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मद्यपान पूर्णपणे बंद करायला सांगणार नाही. परंतु काही गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
गर्भधारणेसाठी शरीरसंबंध कधी ठेवावे? 100% मातृत्व प्राप्तीचा योग्य असा काळ असतो?सेक्स हार्मोन्सची पातळी होते शरीर मोठ्या प्रमाणात हार्मोन्स तयार करते आणि त्याचा तुमच्या मूडवर परिणाम होतो. टेस्टोस्टेरॉन आणि डोपामाइन समाविष्ट असलेल्या सेक्स हार्मोन्सचा तुमच्या कामवासनेवर मोठा परिणाम होऊ शकतो. हे कालांतराने वाढतात आणि कमी होतात, त्यामुळे तुमच्या कामवासनेत चढ-उतार येऊ शकतात. उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये ओव्हुलेशनच्या आधी आणि ओव्हुलेशनदरम्यान टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. यामुळे तुमची कामवासना वाढते. या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
सेक्स कमी आनंददायक बनतो तुम्ही मद्यधुंद अवस्थेत असताना लैंगिक संबंध ठेवता तेव्हा तुमच्या हात-डोळ्याचे समन्वय हवे तेवढ्या प्रमाणात होत नाही. परिणामी तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तुमच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही. बहुतेक लोक मद्यपान करतात तेव्हा लैंगिक संबंधांना समान शारीरिक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे ऑर्गॅजमपर्यंत पोहोचण्यात अडचण येऊ शकते. ऑर्गॅजम मिळवणे कठीण होते स्त्रियांची उत्तेजना देखील चांगल्या रक्ताभिसरणावर अवलंबून असते आणि अल्कोहोल क्लिटॉरिस आणि योनीच्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकते. त्यामुळे महिलांनी मद्यपान केले असेल तर सेक्स करताना त्यांना उत्तेजित होणे किंवा कामोत्तेजनापर्यंत पोहोचणे अवघड होऊ शकते. यामुळे शिर्षबिंदूपर्यंत पोहोचण्यास पुरुषांना जास्त वेळ लागू शकतो आणि लैंगिक संबंधांची तीव्रता कमी होते. प्रजननक्षमतेवर परिणाम होतो मद्यपान केल्याने प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही बाळ होऊ देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या पिण्याच्या सवयी तपासाव्या लागतील. महिलांनी नियमितपणे मद्यपान केल्यास गर्भधारणा होण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: जास्त मद्यपान केल्याने ओव्हुलेशनचे अनेक विकार होऊ शकतात. पुरुषांच्याबाबतीत अल्कोहोल सेक्स ड्राइव्हवर परिणाम करण्याबरोबरच शुक्राणूंच्या गुणवत्तेवर देखील परिणाम करू शकते. हे तुमच्या शुक्राणूंची संख्या, आकार, हालचाल आणि प्रमाण कमी करू शकते. यामुळे जोडीदाराला गर्धारणा होणे अधिक कठीण होऊ शकते. शास्त्रानुसार ‘या’ तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो मोठ्या प्रमाणात शारीरिक कार्यं करण्यासाठी रात्री चांगली झोप घेणे महत्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे तुमची लैंगिक इच्छा कमी होऊ शकते आणि उत्तेजना अनुभवणे अधिक कठीण होऊ शकते. अल्कोहोल तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. तुमचे शरीर जसे अल्कोहोल पचवते तसे ते अधिक मानसिकदृष्ट्या उत्तेजित होते. याचा अर्थ असा की तुम्हाला झोपणे कठीण होऊ शकते किंवा तुमची झोप वारंवार मोडू शकते. याचा तुमच्या कामवासनेवर परिणाम होऊ शकतो.