JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त महिनाभर प्या मनुक्याचे पाणी; शरीराला होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

फक्त महिनाभर प्या मनुक्याचे पाणी; शरीराला होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

शरीरातील वात आणि पित्त दोष संतुलित करण्यासाठी मनुका अतिशय प्रभावी ठरतो. मनुके भरपूर पोषक घटकांनी आणि कॅलरीजनी समृद्ध असतात आणि ते आरोग्यासाठी वरदान मानले जातात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 डिसेंबर : ड्रायफ्रूट्समधील एक प्रकार असलेला मनुका हे अतिशय पौष्टीक फळ आहे. मनुके खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. मनुक्यासोबत त्याची पाने, बिया आणि सालीमध्ये देखील उपयुक्त गुणधर्म असतात. शरीरातील वात आणि पित्त दोष संतुलित करण्यासाठी मनुका अतिशय प्रभावी ठरतो. मनुके भरपूर पोषक घटकांनी आणि कॅलरीजनी समृद्ध असतात आणि आरोग्यासाठी वरदान मानला जातात. डायटिशियन मनप्रीतने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला मनुक्याच्या पाण्याचे फायदे सांगत आहोत. दररोज मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीरात काही दिवसात अनेक मोठे बदल दिसून येतात. मनुक्याविषयी बोलताना त्यात असलेली पौष्टिक मूल्ये आणि गुणधर्म याविषयी जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. हरजिंदगीच्या रिपोर्टनुसार मनुक्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज गुणधर्म असतात. त्यामुळे त्याची चव गोड असते.

वजन कमी करायचंय? मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्त

याशिवाय मनुक्यात एस्कॉर्बिक ऍसिड, रायबोफ्लेविन, थायामिन, पायरिडॉक्सिन इत्यादी जीवनसत्त्वे, फायबर आणि झिंक, फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम ही खनिजे आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. मनुक्याचे पाणी बनवणे खूप सोपे आहे. यासाठी 4 ते 5 मनुके एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.

पोटासाठी उपयुक्त मनुक्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट चांगले साफ होते. मनुक्यांमध्ये असलेल्या थंड गुणधर्मामुळे अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तसेच दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे आतड्यांचे कार्य सुधारते. अनिमियामध्ये उपयुक्त मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते. त्यामुळे त्याचे पाणी अॅनिमियामध्ये अतिशय उपयुक्त ठरते. याशिवाय यात असेलेले व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त मनुक्यात असलेल्या व्हिटॅमिन-सी आणि अँटिऑक्सिडंटमुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते. याशिवाय यात आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट गुणधर्म बॅक्टेरियल संसर्गाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या टाळता येऊ शकते. रोज मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन-सी मिळते. त्यामुळे केस चमकदार आणि दाट होतात. मनुक्याच्या पाण्याने कोंडा देखील दूर होता.

…म्हणून हिवाळ्यात दही खायचं ते मातीच्या भांड्यातीलच; फायदे वाचून थक्क व्हाल

दात आणि हाडांसाठी मनुका पाणी मनुक्याच्या पाण्यात असलेले कॅल्शियम दातांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. यात असलेले कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक असते. मनुक्यात असलेले बोरॉन हे पोषक तत्व हाडांच्या निर्मितीसाठी आणि कॅल्शियमचे उत्तमरित्या शोषण करण्यासाठी आवश्यक असते. यातील पोटॅशियम, बोरॉन आणि कॅल्शियम महिलांच्या ऑस्टियोपोरोसिसमध्ये उपयुक्त ठरते.

संबंधित बातम्या

वजन वाढवण्यासाठी उपयुक्त मनुक्याचे पाणी वजन वाढवण्यासाठी देखील फायदेशीर असते. तुम्ही खूप पातळ असाल तर वजन वाढवण्यासाठी मनुक्याचे पाणी हा एक उत्तम नैसर्गिक मार्ग आहे. रोज दुधासोबत मनुके खाल्ल्याने तुमची वजन आणि पचनशक्ती दोन्ही वाढते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या