फोटो सौजन्य -@kingnabil69/TikTok
ब्रिटन, 16 मार्च : ‘दोन दिवसांपूर्वी मला वाटत होतं मी आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. पण आता मला समजलं मी 31 भावंडांपैकी एक आहे’, डीएनए टेस्टनंतर अँडी नबिलला बसलेला हा मोठा धक्का. एकुलता एक वाढलेल्या अँडीला दोन दिवसांतच तब्बल 30 भावंडं मिळाली. तीसुद्धा मानलेली नाही तर रक्ताच्या नात्याची. टिकटॉकवर एक ट्रेंड सुरू होता. जिथं लोक आपली डीएनएन टेस्ट करून त्याबाबत माहिती देत होते. अनेकांनी आपली डीएनए टेस्ट करून आपला कौटुंबिक इतिहास जाणून घेतला. त्याबाबत त्यांनी टिकटॉकवर माहिती दिली. अँडीदेखील अशाचपैकी एक होता. त्याने आपली डीएनए टेस्ट करून आपल्या कुटुंबाबाबत माहिती जाणून घेतली. तेव्हा त्याला जे काही समजलं त्यानंतर तो हैराणच झाला आणि आपला व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला. हे वाचा - भयंकर! हातातल्या अजगराने डोळ्यावर अटॅक केला आणि… Shocking video viral द सन च्या रिपोर्टनुसार अँडीने सांगितलं की, डिसेंबरमध्ये त्याने आपली डीएनए टेस्ट करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. रिपोर्टमध्ये त्याला वडिलांच्या जागी अशा व्यक्तीचं नाव दिसलं जे त्याचे वडील नव्हते. मग डीएनएमध्ये ज्यांचं नाव त्याचे वडील म्हणून येत होते त्यांच्याबाबत त्याने माहिती मिळवली आणि मग त्याला समजलं की एन्डी हा त्यांचा एकच मुलगा नव्हता तर त्यांची अशी बरीच मुलं होती. दोन-तीन नव्हे तर अँडी पकडून एकूण 31 मुलं. हे वाचा - काय ही हौस! या 72 वर्षांच्या आजोबांच्या शरीरावर आहेत 85 टॅटू! एकाच वडिलांपासून झालेली ही 31 मुलं. म्हणजे अँडीचे तब्बल 30 भावंंडं होती. या 31 जणांमध्ये अँडी हा दुसरा सर्वात मोठा मुलगा होता. इतकंच नव्हे तर त्याची एक मैत्रीणीच त्याची बहीण निघाली. ज्याबाबत त्याला नंतर माहिती झाली.