मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /काय ही हौस! या 72 वर्षांच्या आजोबांच्या शरीरावर आहेत 85 टॅटू!

काय ही हौस! या 72 वर्षांच्या आजोबांच्या शरीरावर आहेत 85 टॅटू!

जगातले सर्वाधिक टॅटू काढणारे हे आजोबा आहेत. यांना आजोबा म्हणणंही जीवावर येईल खरं तर. त्यांच्या शरीराच्या 98 टक्के भागावर टॅटूची शाई आहे.

जगातले सर्वाधिक टॅटू काढणारे हे आजोबा आहेत. यांना आजोबा म्हणणंही जीवावर येईल खरं तर. त्यांच्या शरीराच्या 98 टक्के भागावर टॅटूची शाई आहे.

जगातले सर्वाधिक टॅटू काढणारे हे आजोबा आहेत. यांना आजोबा म्हणणंही जीवावर येईल खरं तर. त्यांच्या शरीराच्या 98 टक्के भागावर टॅटूची शाई आहे.

    जर्मनी, 14 मार्च : अनेक लोकांना आयुष्यात एकतरी टॅटू (Tattoo) अंगावर काढून घेण्याची इच्छा असते. तो टॅटू म्हणजे धर्मापासून (Religion) ते साहित्यापर्यंत (Literature) निगडीत चिन्ह किंवा एखादं सांकेतिक चिन्ह (Sign), चित्र, नाव (Name) असं काहीही असू शकतं. ज्यामुळं आनंद मिळू शकतो असा एखादा टॅटू काढण्याची अनेकांची इच्छा असते; पण काही लोक शाईचे (Ink) काही थेंब शरीरावर लागण्यावरच समाधान मानतात. जर्मनीतील 72 वर्षांच्या वोल्फगँग किर्श (Wolfgang Kirsch) यांनी मात्र आपली टॅटू काढायची हौस पुरेपूर भागवली आहे. त्यांच्या शरीराच्या जवळपास 98 टक्के भागांवर टॅटू काढलेले आहेत. जर्मनीतील सर्वाधिक टॅटू असणारी व्यक्ती म्हणून त्यांनी मान पटकावला आहे.

    त्यांच्या शरीरावर दहा -वीस नव्हे तर तब्बल 86 टॅटू आहेत. त्याशिवाय त्वचेखाली त्यांनी 17 इम्प्लांटस केले आहेत. पायांचे तळवे वगळता त्यांच्या शरीरावर चेहरा, पाय, डोळे अगदी ओठांवरदेखील टॅटू आहेत. त्यांनी त्वचेखाली केलेले काही इम्प्लांटस चुंबकीय (Magnetic Implants) आहेत. त्यामुळं पेपरक्लिप्ससारख्या छोट्या धातूच्या वस्तू त्यांच्या त्वचेकडं खेचल्या जातात. त्यामुळं त्यांनी स्वत:ला मॅग्नेटो (Magneto) असं टोपणनाव दिलं आहे. त्यांना टॅटू काढण्याचं एवढं वेड का लागलं याचं कारणही अगदी क्रांतिकारक आहे.

    लाड बायबलनं (Lad Bible) दिलेल्या माहितीनुसार, किर्श किंवा मॅग्नेटो हे आधी पूर्व जर्मनी किंवा जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिकमध्ये टपाल खात्यात कर्मचारी होते. त्या वेळी एकदा टपाल कर्मचाऱ्यांना टॅटू काढण्यात आले. त्या वेळी 46 वर्षांच्या किर्श यांनी आयुष्यात प्रथम टॅटू काढून घेतला. डोळ्याखाली एक अश्रू असा त्यांचा टॅटू होता. किर्श यांना नेहमीच जगापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असे. आपण इतरांपेक्षा वेगळे असलं पाहिजे असं त्यांना वाटत असे. यातूनच त्यांचा टॅटू काढून घेण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. सध्याची स्थिती प्राप्त करण्यासाठी त्यांना 20 वर्षांहून अधिक कालावधी लागला आहे, पण त्याबद्दल त्यांना यत्किंचीतही खंत नाही. एवढे टॅटू काढून घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत एकूण 240 वेळा टॅटू सत्रं पूर्ण केली आहेत. जवळपास 720 तास म्हणजे साधारण एक महिन्याचा कालावधी त्यांनी खुर्चीवर बसून सुया टोचून घेण्यात घालवला आहे. टॅटूसाठी त्यांनी सुमारे 30 हजार युरो म्हणजे 21 लाख 84 हजार 861 रुपये खर्च केले आहेत.

    (हे वाचा: OMG! Mermaid baby, जन्माला आलं माशासारखं शरीर असलेलं बाळ)

    टॅटूमुळं त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली असून, मॉडेलिंग किंवा फोटोशूट्ससाठी त्यांना आवर्जून बोलावलं जातं. या क्षेत्रात त्यांना मोठी मागणी आहे. अगदी रस्त्यावरून जात-येत असतानाही लोक त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागतात आणि लोकांना त्यांच्याबरोबर फोटो काढायचा असतो. जर्मनीतील सर्वाधिक टॅटू असणारी व्यक्ती तर ते आहेतच; पण सर्वाधिक टॅटू असणारी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचा मानही त्यांच्याकडेच जातो.

    First published:
    top videos

      Tags: Old man