मुंबई, 06 फेब्रुवारी : माझा होशील ना मालिका (Majha Hoshil Na) आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. फक्त सई (sai) आणि आदित्यसाठी (Aditya) नाही तर या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आणि सई म्हणजेच गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आदित्य म्हणजेच विराज कुलकर्णी (Virajas Kulkarni) यांच्या चाहत्यांसाठीदेखील हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. लवकरच सई आदित्यची आणि आदित्य सईचा होणार आहे. व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर त्यांचं लग्न होणार आहे. पण लग्नाआधीच त्यांचा रोमान्स सुरू झाला आहे. सई आणि आदित्य 14 फेब्रुवारी, 2021 ला लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे काही व्हिडीओही समोर येत आहेत. सध्या असाच एक सई आणि आदित्यचा रोमँटिक व्हिडीओ पाहायला मिळतो आहे. ज्यामध्ये आदित्य सईला झोका देतो आहे.
सई आणि आदित्य दोघंही वधू-वराच्या वेशात आहे. सई एका झोपाळ्यावर बसली आहे आणि आदित्य तिला झोका देतो आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर एक होणार असल्याचा आनंद झळकतो आहे. एरवी बिनधास्त राहणारी सई यामध्ये गोड लाजतानाही दिसते आहे. हे वाचा - ‘मी सुष्मिता सेनच्या मुलींचा बाबा’, बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा मोठा खुलासा झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. रातराणी आणि चाफ्याच्या लग्नाला यायचं हं! असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
याआधी सई आदित्यच्या लग्नातील एक सुंदर अशा क्षणाचा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये आदित्य सईसमोर मंगळसूत्र धरून आहे. आता सईच्या गळ्यात आदित्यच्या नावाचं हे मंगळसूत्र पडणार ते व्हेलेंटाइन डेच्या मुहूर्तावर. याच दिवशी हा क्षण प्रत्यक्ष साकारताना पाहायला मिळणार आहे. हे वाचा - लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा प्रभाससोबत करणार बॉलीवूडमध्ये ‘आरंभ’? काही दिवसांपूर्वीच आदित्य म्हणजे लग्नाचा प्रोमो दाखण्यात आला होता. ज्यामध्ये सईनं गोड असा उखाणा घेतला होता. तेव्हा या दोघांचं लग्न होणार हे पक्कं समजलं आणि अखेर तो दिवसही जाहीर झाला. आदित्य आणि सईचं लग्न आता त्यांच्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी व्हेलेंटाइन डेचं एक गिफ्टच असेल.