वॉशिंग्टन, 14 जून : कोरोनाव्हायरसपासून बचाव करता करता मास्क हा आता आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. सामान्यपणे सर्जिकल, एन95, यापुरतीच मास्क मर्यादित राहिला नाही, तर कोरोनाच्या या काळात अनेक मास्क आपण पाहिले. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार मास्क तयार केले. आता आणखी एका अशाच वेगळ्या मास्कचा व्हिडीओ समोर आला आहे. हा मास्क हसणारा आणि बोलणारा आहे. अमेरिकेतील गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टेलर ग्लेयल यांनी हा विशेष प्रकारचा मास्क तयार केला आहे. हा हसता बोलता मास्क कोरोनाव्हायरसापूनही बचाव करतो.
या मास्कमध्ये एलईडी लाइट लावण्यात आल्यात. तुमच्या तोंडाच्या हालचालीनुसार या एलईडी लाइट्सची हालचाल होते. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मास्कही बोलू लागतो, जेव्हा तुम्ही हसता तेव्हा मास्कही हसू लागतो आणि जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा मास्कही शांत होतो. एखाद्या इमोजीप्रमाणे या मास्कवरही आपल्या भावना उमटतात. प्रोग्रामर टेलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ऑनलाइन असा मास्क शोधला मात्र त्यांना सापडला नाही, अखेर त्यांनी स्वत:च हा मास्क तयार केला. हे वाचा - घरच्या घरीही करू शकता कोरोनावर मात; डॉक्टरांनी सांगितला उपाय हा मास्क कापडी असून त्याच्या आत 16 एलईडी लाइट्स लावण्यात आल्यात. या मास्कमध्ये वॉइस पॅनेल लावण्यात आलेत जे एलईडीशी जोडण्यात आले. हा मास्क निर्जंतुकही करता येऊ शकतं. मास्कचं कापड आणि त्यातील एलईडी लाइटचं पॅनेल बाहेर वेगळं करता येऊ शकतं. त्यानंतर कापड धुऊन घेता येईल आणि आतील वस्तू यूव्ही लॅम्पने सनिटाइझ करता येऊ शकता, असं टेलर यांनी सांगितली. या एका मास्कची किंमत जवळपास 3800 रुपये आहे. टेलर यांनी हा मास्क सध्या तरी फक्त स्वत:साठी तयार केला आहे. त्याला विकण्याचा त्यांचा उद्देश नाही. हे वाचा - माहिती आहे का? रक्तदान केल्याने फक्त गरजूलाच नाही तर तुम्हालाही होतो फायदा या मास्कचा वापर जास्त वेळही केला जाऊ शकत नाही, कारण त्यामध्ये एलईडी लाइट्स आहेत, ज्या काही तासांनंतर गरम होतात. त्यामुळे जास्त कालावधी मास्क वापरणाऱ्यांना आणि लहान मुलांसाठी हा मास्क योग्य नाही, असंही टेलर यांनी स्पष्ट केलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - शरीराच्या ‘या’ भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार