घरच्या घरीही करू शकता कोरोनावर मात; डॉक्टरांनी सांगितला उपाय

घरच्या घरीही करू शकता कोरोनावर मात; डॉक्टरांनी सांगितला उपाय

डॉक्टरांच्या मते, योग्य ती काळजी घेतली तर 80 ते 90% कोरोना रुग्ण घरच्या घरीच बरे होऊ शकतात.

  • Share this:

मुंबई, 14 जून : कोरोनाव्हायरसची (coronavirus) लक्षणं दिसल्यानंतर मनात एक भीतीच निर्माण येते, त्यातही आपला कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पायाखालची जमीनच सरकते. अनेक प्रश्न मनात गोंधळ माजवतात. कोरोनाची लागण झालेल्या काही रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं जातं आहे, तर काही रुग्ण होम क्वारंटाइन होऊन कोरोनाव्हायरसशी लढा देत आहेत. मात्र घरच्या घरी कोरोनाव्हारसवर कशी मात करता येईल, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.

घरच्या घरी कोरोनावर मात करण्यासाठी काय करायला हवं, याबाबत अमेरिकेतल्या मेरिलँड युनिव्हर्सिटी अपर चेसापिक हेल्थचे डॉक्टर फहीम युनूस (Faheem Younus) यांनी मार्गदर्शन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी नागरिकांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं निरसन केलं आहे.  डॉ. फहीम म्हाणाले, "जर विशेष काळजी घेतली तर 80 ते 90% कोरोना रुग्ण घरच्या घरीच बरे होऊ शकतात"

घरच्या घरी कोरोनाव्हायरसवर मात करण्यासाठी डॉ. फहीम यांनी खालील सल्ला दिला आहे.

कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर आपली रूम आणि बाथरूम वेगळा असावा

जर तुमच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर स्वत:ला इतरांपासून 14 दिवस वेगळं करावं, एका वेगळ्या खोलीत राहवं जिथं फक्त तुमचाच वावर असेल. शक्यतो बाथरूम आणि भांडीही वेगळी असावीत.

हे वाचा - धक्कादायक! होम क्वारंटाईन न राहता फिरले शहरभर, 4 कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा

जर तुमच्या घरात अशी वेगळी खोली नसेल सर्वजण एकाच खोलीत राहत असतील तर एखादा मोठा पडदा टाकून खोलीचे दोन भाग करा. पडद्याच्या एका बाजूला रुग्ण आणि दुसऱ्या बाजूला घरातील इतर सदस्य राहतील. यासोबतच बाथरूमही एकच असेल तर सर्वात आधी फेसम मास्क घाला. बाथरूम वापरल्यानंतर बाथरूम नीट स्वच्छ करा. तुम्ही वापरत असलेले नेब्युलायझर आणि स्टीम इतरांसोबत शेअर करू नका.

औषधांबाबत जास्त काळजी करू नका

बदलत्या वातावरणामुळे कोरोना आणि सामान्य फ्लू यामधील फरक ओळखणं अवघड होऊ शकतं. यामुळे ताप आल्यानंतर फक्त पॅरासिटामोल किंवा आयबुप्रोफेन हेच औषध घ्या. शरीराचं तापमान, श्वसनादर आणि रक्तदाब तपासत राहा. मोबाइलवरदेखील असे बरेच अॅप आहेत, ज्यामार्फत याबाबत तुम्हाला माहिती मिळेल.

योग्य आहार आणि पुरेशी झोप घ्या

सेल्फ क्वारंटाइन असताना मनाला शांती मिळेल आणि चिंता कमी होईल अशी काम करण्याचा प्रयत्न करा. कोरोना हरवण्याचा प्रवास खूप मोठा असतो. काही वेळा दोन ते तीन आठवडेही लागू शकतात. अशा परिस्थिती अजिबात घाबरू नका. यादरम्यान योग्य आहार घ्या, घरात शिजवलेलंच अन्न खा आणि पुरेशी झोप घ्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. यानंतरही जर तुमच्या प्रकृतीत सुधारणा होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा रुग्णालयात दाखल व्हा. बहुतेक प्रकरणात मृत्यूची शक्यता एक टक्क्यांहूनही कमी असते.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - कमालच झाली! कोरोनाग्रस्त हेअरस्टायलिस्टच्या संपर्कात आलेल्या एकालाही झाला नाही कोरोना

First published: June 14, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading