माहिती आहे का? रक्तदान केल्याने फक्त गरजूलाच नाही तर तुम्हालाही होतो फायदा
World Blood Donor Day च्या निमित्ताने रक्तदानाचा रक्तदात्याला काय फायदा होतो ते जाणून घेऊयात
|
1/ 6
रक्तदानामुळे एखादा गंभीर आजार असलेल्या रुग्णाचा, अपघातग्रस्ताचा अशा अनेक गरजूंचा जीव वाचवता येतो. म्हणूनच रक्तदान हे महादान असं म्हटलं जातं. मात्र रक्तदान केल्याने त्याचा फायदा फक्त गरजूलाच नाही तर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला होतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
2/ 6
रक्तदान केल्यानंतर शरीरात पुन्हा रक्तनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे लाल रक्तपेशींमध्ये वाढ होते.
3/ 6
रक्तदानामुळे शरीरातील आयर्न म्हणजे लोहाचं प्रमाण नियंत्रणात राहतं. शरीरात लोहाचं प्रमाण वाढल्यास हृदय, यकृत यासारख्या अवयवांना हानी पोहोचते.
4/ 6
रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि परिणाम वजन घटण्यास मदत होते.
5/ 6
रक्तदान करण्यापूर्वी आरोग्याच्या अनेक चाचण्या केल्या जातात. हिमोग्लोबिन, हार्ट रेट, ब्लड प्रेशर तपासलं जातं, रक्तदानानंतरही रक्ताची चाचणी होते. ज्यामुळे तुम्हाला एखादी समस्या किंवा एखादा आजार असल्यास त्याचं निदीन होतं.
6/ 6
मेडिकल न्यूज टुडेमधील रिपोर्टनुसार, रक्तदान केल्यानं रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहत असल्याचं एका संशोधनात दिसून आलं आहे. (फोटो - रॉयटर्स)