ठरलेल्या तारखेला मासिक पाळी आली नाही किंवा उशिराने आली तर अनेक महिलांना बरं वाटतं, त्या दिवसाचा त्रास थोडे दिवस दूर झाला असं वाटतं. मात्र वारंवार मासिक पाळी उशिराने येणं बरं वाटत असलं तरी ती एखादी गंभीर समस्या असू शकते. तज्ज्ञांच्या मते, ज्या दिवशी तुम्हाला मासिक पाळी यायला हवी, त्याच्या 5 दिवसांत आली नाही, तर मासिक पाळी उशिराने आली असं समजावं. मासिक पाळी आली नाही की अनेक महिलांना आपण प्रेग्नन्ट तर नाही ना असा प्रश्न पडतो. मात्र तुम्ही प्रेग्नन्ट नसाल तर तुमची पाळी न येण्यामागे किंवा उशिराने येण्यामागे इतर कारणे असू शकतात. त्यामुळे मासिक पाळीकडे दुर्लक्ष करू नका, त्याला गांभीर्याने घ्या आणि डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांचा सल्ला जरूर घ्या. मासिक पाळी अनियमित होण्याची काय कारणे आहेत पाहुयात. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) अनियमित मासिक पाळी हे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं लक्षण आहे. या समस्येचा तुमच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या असल्य.स तुमची मासिक पाळी 2 आठवड्यांनी किंवा ३ ते ६ महिन्यांनी आणि अगदी एका वर्षानेही येऊ शकते. पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज लैंगिक संक्रमण संसर्गावर उपचार न झाल्यास गर्भाशय, अंडाशयाला होणारं हे इन्फेक्शन आहे. यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. युटेराईन फायब्रॉईड (Uterine fibroids) ही समस्या असल्यास भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो. शिवाय तुमची मासिक पाळी चुकूही शकते. या लक्षणांसह तुम्हाला पेल्व्हिकमध्ये वेदना, वारंवार लघवी किंवा बद्धकोष्ठता अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्भपात तुम्ही प्रेग्नन्ट असाल आणि त्यानंतर रक्तस्राव होत असेल, तर गर्भपात (miscarriage) झालेला असू शकतो. हेदेखील वाचा - महिलांनो Vagina Discharge बाबत तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात थायरॉईडची समस्या घशामध्ये असलेली थायरॉईड ग्रंथी चयापचाय प्रक्रिया नियंत्रित करते. हायपोथायरॉईड्झम किंवा हायपरथायरॉईड्झम कोणतीही समस्या असली तरी त्याचा तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. गर्भनिरोधक गोळ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम म्हणजे कमी प्रमाणात किंवा मासिक पाळी न येणे. गर्भनिरोधक गोळ्या थांबल्यानंतर तुमच्या मासिक पाळीचं चक्र सुरळीत होण्यासाठी एक ते ३ महिने लागू शकतात. त्यानंतरही तुमच्या मासिक पाळीवर लक्ष ठेवा. औषधं तुम्ही छोट्या छोट्या वेदनांसाठी मेडिकलमधून औषधं घेत असाल, तर काही औषधांचा परिणाम मासिक पाळीवर होतो. मानसिक ताण तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार याला hypothalamic amenorrhea असं म्हणतात. ज्यात मानसिक ताणामुळे मेंदूतील hypothalamus या भागावर परिणाम होतो, जो मासिक पाळीला नियंत्रित करतो. जास्त व्यायाम जास्त व्यायाम, भरपूर वजन कमी होणं, याचा परिणाम हार्मोन्सच्या पातळीवर होतो आणि पाळी अनियमित होते. हेदेखील वाचा - महिलांनो UTI च्या समस्येला दूर ठेवायचं आहे, मग ‘हा’ आहार घ्या