महिलांनो UTI च्या समस्येला दूर ठेवायचं आहे, मग 'हा' आहार घ्या

महिलांनो UTI च्या समस्येला दूर ठेवायचं आहे, मग 'हा' आहार घ्या

मांसाहार (Non-vegetarian) करणाऱ्या महिलांच्या तुलनेत शाकाहार (vegetarian) करणाऱ्या महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा (urinary tract infection) धोका कमी आहे, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (Urinary tract infection - UTI) म्हणजे लघवीच्या मार्गात होणारे संक्रमण होय. ही समस्या महिलांमध्ये जास्त आढळते. मात्र मांसाहारी (Non-vegetarian) महिलांच्या तुलनेत शाकाहारी (vegetarian) महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका कमी असतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

तैवानमधील त्झु चाई युनिव्हर्सिटीच्या (Tzu Chi University) संशोधकांनी केलेलं हे संशोधन जर्नल सायंटिफिक रिपोर्टमध्ये (The journal Scientific Reports) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. The Guardian ने याबाबत माहिती दिली आहे.

हेदेखील वाचा - सावधान !  प्रेग्नन्सीमध्ये करू नका ‘ही’ चूक; नाहीतर बाळाला होऊ शकतं फ्रॅक्चर

काय आहे संशोधन?

संशोधकांनी 9 हजार पेक्षा जास्त व्यक्तींचा सुमारे 10 वर्ष अभ्यास केला, या व्यक्तींना अभ्यासाच्या सुरुवातीला यूटीआयची समस्या नव्हती. मात्र 10 वर्षांच्या कालावधीत संशोधकांना दिसून आलं की,

3,257 शाकाहार करणाऱ्यांपैकी 217 जणांना यूटीआयची समस्या उद्भवली

6,467 मांसाहार करणाऱ्यांपैकी 444 जणांना यूटीआयची समस्या उद्भवली

मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारींमध्ये यूटीआयचा धोका 16 टक्क्यांनी कमी होता.

यूटीआयला कारणीभूत ठरतात ते ई-कोली (E coli) बॅक्टेरिया आणि या बॅक्टेरियांचा स्रोत आहे, ते म्हणजे मांस. त्यामुळे मांसाहाराच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींना याचा धोका नसतो.

शिवाय शाकाहार म्हणजेच हाय फायबर डाएट ज्यामुळे ई-कोली बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते.

हेदेखील वाचा -  मूल झाल्यानंतरही कसं राहाल रोमॅन्टिक ! जरूर वाचा 'या' टिप्स

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची लक्षणं

लघवी करताना वेदना, जळजळ

वारंवार लघवीला जावंसं वाटणं

ओटीपोटात दुखणे

मळमळ, उलटीही होऊ शकते

इन्फेक्शन तीव्र असल्यास तापही येऊ शकतो.

First published: February 2, 2020, 3:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या