JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Natural Pain-Killers - आपल्या किचनमध्ये असलेल्या नैसर्गिक वेदनाशामक औषधांबद्दल जाणून थक्क व्हाल!

Natural Pain-Killers - आपल्या किचनमध्ये असलेल्या नैसर्गिक वेदनाशामक औषधांबद्दल जाणून थक्क व्हाल!

दीर्घकाळ रसायनयुक्त औषधांचे सेवन केल्यास आपल्याला कमकुवत स्मरणशक्ती, मूड बदलणे, बद्धकोष्ठता, कमकुवत एकाग्रता आणि मंद श्वासोच्छवास (Long Medication Can Cause Poor Memory, Mood Swings, Constipation, Poor Concentration And Slow Breathing) यासह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मे : भारतात अगदी पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदाला खूप महत्व आहे. त्यामुळे काही छोट्या छोट्या शारीरिक किंवा मानसिक समस्या सोडवण्यासाठी आपण शक्यतो आयुर्वेदाची मदत घेतो. म्हणजेच काही समस्यांसाठी रासायनयुक्त औषधे न वापरता आपण घरातीलच काही औषधी पदार्थांचा वापर करतो. त्याचप्रमाणे शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ शांत कारण्यासाठी आणि वेदना शमवण्यासाठीही आपण घरातील काही औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करू शकतो. भारतीय मसाल्यांपैकी काही घटक तुमच्या स्नायूंना आराम देतात आणि तुम्हाला वेदनांपासून त्वरित मुक्त करतात. आज आम्ही तुम्हाला किचनमध्ये असलेल्या अशाच काही नैसर्गिक वेदनाशामक औषधींबद्दल (Natural Pain-Killers) सांगणार आहोत, ज्याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हळद नैसर्गिक औषधी म्हंटल की सर्वप्रथम आपल्या डोक्यात नाव येतं ते म्हणजे हळदीचं (Turmeric). हळद ही खूप गुणकारी, सैंदर्यवर्धक, आणि चविष्ट औषधी आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा नैसर्गिक घटक असतो. जो शरीरातील वेदना सहजपणे दूर करू शकतो. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे सूज कमी करण्यास, सांधे आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यात मदत करतात. हळद अँटिऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्मांनी समृद्ध असते. त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी आपल्या जेवणात हळदीचे समावेश करणे फायद्याचे ठरते. शरीरावर मार लागलेल्या ठिकाणी हळद पाण्यामध्ये गरम करून ही पेस्ट लावल्यास अराम मिळतो. त्याचप्रमाणे शरीरावर खरचटले असेल आणि त्यातून रक्त येत असेल तर त्वरित त्यावर हळद लावावी. यामुळे रक्त येणे थांबते आणि हळद त्याठिकाणी इन्फेक्शन होण्यास रोखते. त्याचप्रमाणे हळदीचे दूध पिल्यास तुमच्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. हेही वाचा…  नारळ पाण्याला उगीच म्हणत नाहीत अमृत! उन्हाळ्यात आरोग्यासाठी आहेत इतके सगळे फायदे लवंग लवंग (Cloves) ही विविध दाहक विरोधी गुणधर्म प्रदान करणाऱ्या अनेक संयुगांचे मिश्रण आहे. यातील असाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे युजेनॉल (Eugenol). शरीरातील एखाद्या भागावर सूज येणे आणि इतर असामान्य लक्षणांवर उपचार होत असताना हे युजेनॉल शरीरातील दाहक प्रतिक्रिया कमी करते. लवंगाच्या वापराने दातदुखी किंवा तोंडाच्या समस्या सहज दूर होतात. यासाठी तुम्ही लवंग आणि नारळाच्या तेलाची पेस्ट तयार करा आणि त्रास होत असलेल्या जागी लावा. यामुळे तुमचे दात दुखणे कमी होईल. आले घरात चहा बनवण्यासाठी आणि मसाल्याच्या भाज्या बनवण्यासाठी उपयोगी येणारे आले (Ginger), अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते (Ginger Has High Medicinal Properties). आल्यामध्ये जिंजरॉल (Gingerol) नावाचे एक स्ट्रॉंग बायोएक्टिव्ह कंपाऊंड असते. यामध्ये दाहक-विरोधी (Anti-Inflammatory), अँटीऑक्सिडंट (Antioxidant) आणि कर्करोगविरोधी प्रभाव (Anti-Cancer Effects) असतो. यामुळे शारीरिक वेदना कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आल्याचे सेवन केल्यामुळे श्‍वसनाचे आजार, अंतर्गत वेदना किंवा स्नायू दुखणे यांपासूनही अराम मिळतो. आले चावून खाल्याने जास्त पोषक द्रव्ये शरीरात जातात त्यामुळे आल्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात. अंतर्गत उपचारांसाठी तुम्ही आले किंवा हळदीचा चहा देखील पिऊ शकता. हेही वाचा…  Ginger Side Effects: औषधी गुणधर्म आहे आलं; पण जास्त खाल तर होतील गंभीर दुष्परिणाम पेपरमिंट पेपरमिंटमध्ये (Peppermint) मेन्थॉलचा (Menthol) समावेश असतो, जो शरीरातील दाह म्हणजेच जळजळीपासून आराम देण्यासाठी उपयुक्त (Peppermint Gives Relief From Inflammation) आहे. मेन्थॉल एक थंडगार कूलिंग इफेक्ट देते ज्यामुळे घसा आणि वेदना कमी होऊ शकतात. पेपरमिंटची काही पाने चावून खाल्याने पचनाच्या समस्या, दातदुखी, डोकेदुखी आणि मज्जातंतूच्या दुखण्यापासूनही अराम मिळतो. पेपरमिंटच्या तेलाने त्रास होत असलेल्या भागावर मसाज केल्याने अधिक थंडावा मिळतो आणि वेदना काही अंशी कमी होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या