- हृदय निरोगी - MedicalNewsToday नुसार, नारळ पाणी हृदयाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. यामध्ये आढळणारे पोटॅशियम उच्च रक्तदाब आणि हृदयरोगींसाठी खूप फायदेशीर आहे.
- हाडांना ताकद देते - नारळाचे पाणी केवळ उच्च रक्तदाब नियंत्रित करत नाही, तर हाडांशी संबंधित अनेक आजारांवरही त्याचा फायदा होतो. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम असते, जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.
- वजन कमी करण्यासाठी - ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळाच्या पाण्यात फॅटचे प्रमाण खूपच कमी असते आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते.
- त्वचेवर चमक आणते - नारळ पाणी प्यायल्याने शरीरासोबतच आपली त्वचाही हायड्रेट राहते. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या आपोआप कमी होतात. नारळपाणी प्यायल्याने त्वचा तर सुधारतेच पण पिंपल्स आणि रॅशेससारख्या समस्याही कमी होतात.
- पचनास उपयुक्त - नारळाच्या पाण्यात फायबर आणि मॅग्नेशियम सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. जे पोटाशी संबंधित समस्यांमध्ये खूप फायदेशीर आहेत. नारळाच्या पाण्याचे दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीसह पोटाच्या इतर समस्यांपासून सुटका मिळते.
- मुतखड्याचा धोका कमी - होतो ज्या लोकांना मुतखड्याची समस्या आहे ते देखील नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यामध्ये असणारे पोषक घटक किडनीमध्ये स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)