मुंबई, 24 एप्रिल : आचार्य चाणक्य यांचे नाव भारतातील महान विद्वानांमध्ये घेतले जाते. आजच्या काळातही लोक आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतात. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणारी व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही, असे म्हणतात. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करूनच चंद्रगुप्त मौर्य राजा झाला. हिंदुस्थान टाईम्स ने दिलेल्या बातमीत आचार्य चाणक्य यांनी लग्नाबाबतही काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन करणाऱ्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते. आचार्य चाणक्यांनी लग्नाबद्दल काय सांगितले आहे (Chanakya Niti) ते जाणून घेऊया- 1- संयम बाळगणारा माणूस आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, धैर्यवान व्यक्तीशी लग्न केल्यास भाग्य बदलते. जीवनात संयम बाळगणे फार महत्वाचे आहे. ज्याच्याकडे संयम नाही, अशा व्यक्तीशी लग्न करू नये. 2- आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, समाधानी राहणाऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याने भाग्य प्राप्त होते. अशी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या जोडीदारासोबत त्याच्या पाठीशी असते. समाधानी वृत्ती नसलेल्या व्यक्तीशी लग्न करू नये. 3- आचार्य चाणक्य यांच्या तत्वानुसार, नेहमी गोड, विनम्र बोलले पाहिजे. गोड बोलणाऱ्या व्यक्तीशी लग्न केल्यास नशीब बदलते. अशा व्यक्तीमुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते. अपशब्द बोलण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करू नये. हे वाचा - शनी येतोय कुंभ राशीत; दीर्घकाळापासून संकटांचा मारा झेलणाऱ्यांना मिळेल दिलासा 4 - राग हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. आचार्य चाणक्यनुसार, ज्या व्यक्ती रागावर नियंत्रण ठेवून आनंदी असतात, त्यांच्याशी लग्न केल्यानं भाग्य बदलतं. ज्या घरात प्रसन्न, विनम्र लोक असतात त्या घरात देव वास करतो. जिथे देव राहतो तिथे कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ शकत नाहीत. चि़डचिडपणा करणाऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. हे वाचा - लांबसडक, सुंदर केसांसाठी जवसाच्या बिया वापरा; अनेक प्रॉब्लेम्सवर नेमका उपाय 5- आचार्य चाणक्य यांच्यानुसार धार्मिक विचारांनी प्रेरित असलेल्या व्यक्तीशी विवाह केल्यास भाग्याची प्राप्ती होते. ज्या घरात नित्य पूजा व पठण होते, त्या घरात देवाचा वास असतो. अशा घरांमध्ये कोणतीही समस्या राहत नाही. धार्मिक नसलेल्या व्यक्तीशी लग्न करू नये. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)