JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / International Dance Day: का साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस? असा आहे नृत्य दिनाचा इतिहास

International Dance Day: का साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस? असा आहे नृत्य दिनाचा इतिहास

29 एप्रिल 1982 रोजी, UNESCO च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने महान नृत्यांगना जीन-जॉर्जेस नवारेच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 एप्रिल : जगभरात 29 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस (International Dance Day) म्हणून साजरा केला जातो. महान नृत्यांगना जीन-जॉर्जेस नवारे (Jean-Georges Noverre Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त हा उत्सव साजरा केला जातो. नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते भावना व्यक्त करण्याचेही एक साधन आहे. मग ती एखाद्याबद्दलची नाराजी असो किंवा एखादी गोष्ट साध्य करण्याचा उत्साह आणि उत्सव असो, तुमच्या प्रत्येक भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नृत्याची मदत घेऊ शकता. इतकेच नव्हे तर नृत्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचे कामही वर्षानुवर्षे केले जात आहे. जाणून घेऊया, आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाचा इतिहास 29 एप्रिल 1982 रोजी, UNESCO च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने महान नृत्यांगना जीन-जॉर्जेस नवारेच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवेरा ही फ्रान्समधील एक निपुण बॅले डान्सर होती, तिने नृत्यावर ‘लेटर्स ऑन द डान्स’ नावाचे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये नृत्याशी संबंधित सर्व बारीक-सारीक गोष्टी आहेत. हे वाचून कोणीही नृत्य शिकू शकेल. हे वाचा -  निरोगी आरोग्यासाठी ही आहेत बेस्ट कुकींग ऑईल; हृदय दीर्घकाळ राहील हेल्दी आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा उद्देश - आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा उद्देश केवळ जगातील सर्व नर्तकांचे प्रोत्साहन वाढवणे इतकाच नाही तर सर्व नृत्य प्रकारांबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवणे हा आहे. ज्यामध्ये जगातील मोठे नेते आणि सरकारे देखील सहभागी आहेत. नृत्य हा स्वतः आनंद घेण्याचा आणि तो इतरांनाही वाटून द्यायचा हाही त्याचा उद्देश आहे. हे वाचा -  रखरखत्या उन्हाळ्यात AC-कूलरशिवाय घर थंड राहू शकतं; हे सोपे उपाय करून बघा ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस - पॅरिसमधील इंटरनॅशनल डान्स थिएटर इन्स्टिट्यूटने यावेळी ऑनलाइन सेलिब्रेशन आयोजित करणार आहे. यावेळी आफ्रिका, आशिया, अमेरिका, युरोप आणि अरब देशांतील नृत्यनिर्मितींना आमंत्रित करण्यात आलं आहे. या उत्सवाअंतर्गत जगभरातील नृत्यातील वैविध्य आणि सौंदर्य दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला यासंबंधी सर्व माहिती मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या