मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Summer Tips : रखरखत्या उन्हाळ्यात AC-कूलरशिवाय घर थंड राहू शकतं; हे सोपे उपाय करून बघा

Summer Tips : रखरखत्या उन्हाळ्यात AC-कूलरशिवाय घर थंड राहू शकतं; हे सोपे उपाय करून बघा

फक्त एसी किंवा कूलरने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळत नाही. असे काही उपाय देखील आहेत ज्याचा स्मार्ट उपयोग करून तुम्ही तुमचे घर थंड ठेवू शकता. आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया.

फक्त एसी किंवा कूलरने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळत नाही. असे काही उपाय देखील आहेत ज्याचा स्मार्ट उपयोग करून तुम्ही तुमचे घर थंड ठेवू शकता. आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया.

फक्त एसी किंवा कूलरने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळत नाही. असे काही उपाय देखील आहेत ज्याचा स्मार्ट उपयोग करून तुम्ही तुमचे घर थंड ठेवू शकता. आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 28 एप्रिल : उन्हाळ्यामुळे भयंकर उष्णता वाढली आहे. घरात थंड हवा ठेवण्याचं आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. घरं थंड ठेवण्यासाठी कित्येकजण कूलर आणि एसीचा आधार घेत आहेत. मात्र, कूलर किंवा एसीच्या सततच्या वापरामुळे वीज बिलातही मोठी वाढ होत आहे. फक्त एसी किंवा कूलरने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळत नाही. असे काही उपाय देखील आहेत ज्याचा स्मार्ट उपयोग करून तुम्ही तुमचे घर थंड ठेवू शकता. आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने घरातील हवा थंड राहण्यास (Measures to keep the house cool in summer) मदत होईल.

- खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा

घराच्या खिडक्या आणि दारांतूनच उष्णता घरात येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या दिवसा बंद ठेवा आणि शक्य असल्यास उन्हाळ्यात घरातील खिडक्यांचे पडदेही बदलू शकता. उन्हाळ्यात कॉटन पडदे उत्तम काम करतात.

- एक्झॉस्ट वापरा

घराच्या आतील गरम हवा काढून टाकण्यासाठी एक्झॉस्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या घरातील गरम हवा बाहेर काढून आतील वातावरण थंड ठेवण्यास खूप मदत होते.

टेबल फॅनसमोर थंड वस्तू ठेवा

तुम्ही उन्हाळ्यात टेबल फॅन वापरत असाल तर एका भांड्यात बर्फाचे तुकडे किंवा थंड पाणी ठेवून पंख्यासमोर ठेवा. हवा त्या भांड्यावरून पुढे त्यावेळी थंड होईल आणि खोलीत थंड राहण्यास मदत होईल. याशिवाय ओले सुती कापडही वापरू शकता.

हे वाचा - शुद्ध औषधी मसाला म्हणजे काळी मिरी; यामुळेच इंग्रजांचा 'गुलाम' राहिला भारत

- विद्युत उपकरणांचा वापर कमी करा

विद्युत उपकरणे उष्णता निर्माण करतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात त्यांचा वापर केल्याने तुमच्या घराचे तापमान आणखी वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात खूप गरज नसेल तर विद्युत उपकरणे वापरू नयेत.

- खोलीचा बल्ब बदला

घरातील प्रकाशामुळे उष्णताही वाढते. त्यामुळे तुमच्या घरात जास्त वॅटचे बल्ब लावले असतील तर तुम्ही त्याऐवजी LED बल्ब लावू शकता. हे बल्ब कमी वॅटेजचे असून पुरेसा प्रकाशही देतात.

हे वाचा - मे महिना या 5 राशीच्या लोकांसाठी राहील खास; नोकरी-धंद्यात बक्कळ कमाईचे योग

- छतावर पाणी मारा

उन्हाळ्यात संध्याकाळनंतर घराच्या छतावर पाणी टाकले तर छताला थंडावा मिळेल आणि रात्री पंखा चालवला तर गरम हवेऐवजी थंड हवा खोलीत येईल. वास्तविक, दिवसभर उन्हाच्या तडाख्यात छप्पर तापते आणि त्यामुळे पंखा चालू असताना हवा गरम होते.

First published:

Tags: Summer, Summer hot