JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Cooking Tips : कितीही वापरला तरी महिन्याच्या आत संपणार नाही Cooking Gas; असा जबरदस्त जुगाड

Cooking Tips : कितीही वापरला तरी महिन्याच्या आत संपणार नाही Cooking Gas; असा जबरदस्त जुगाड

एलपीजी बचत करणे हे जरा कठीण काम आहे. काही वेळा लाख प्रयत्नांनंतरही गॅस लवकर संपतो किंवा गॅस पाइपलाइनचे बिल वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स वापरून एलपीजी वाचवू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑक्टोबर : पाणी गरम करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व कामांसाठी बहुतेक लोक स्वयंपाकाचा गॅसचा वापर करतात. मात्र गॅस सिलेंडरची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण गॅस वाचवण्याचा प्रयत्न करतात, जे योग्यदेखील आहे. मात्र तरीही बहुतेक घरांमध्ये गॅस सिलेंडर लवकर संपतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या मार्गांनी गॅसची बचत करू शकता. दैनंदिन छोट्या-छोट्या कामांमध्ये गॅस खूप वापरला जातो, त्यामुळे तुम्हाला एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडर मागवावे लागतातच. त्याचप्रमाणे गॅस पाइपलाइन असलेल्या घरांनाही गॅसचे बिल भरपूर येते. मात्र तुम्ही काही टिप्सच्या मदतीने स्वयंपाकाचा गॅस वाचवू शकता. चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकाचा गॅस वाचवण्यासाठी काही टिप्स. प्रेशर कुकर वापरा स्वयंपाक करताना, काही लोक कुकरची साफसफाई टाळण्यासाठी भांड्यात डाळ आणि तांदूळ शिजवतात, ज्यामध्ये बराच गॅस वापरला जातो. डाळ, तांदूळ शिजवण्यासाठी आणि बटाटे उकडण्यासाठी प्रेशर कुकर वापरणे केव्हाही चांगले. यामुळे गॅसची बचत होते.

तुम्ही देखील चहासोबत ब्रेड खाता का? मग सावधान! यामुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान

पाण्याचा मर्यादित वापर करा गॅस वाचवण्यासाठी स्वयंपाक करताना पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष देण्यास विसरू नका. स्वयंपाक करताना पाण्याचा मर्यादित वापर करा, त्यामुळे पाणी कमी वेळात लवकर आटते आणि गॅसची बचत होते. तसेच डाळी, चणे आणि राजमा यासारख्या गोष्टी लवकर शिजवण्यासाठी तुम्ही त्यांना काही काळ आधी भिजवून ठेवा. यामुळे ते लवकर शिजतात आणि गॅस वाचतो.

झाकण ठेवा स्वयंपाक करताना भांडी उघडी ठेवल्याने अन्न उशिरा शिजते आणि गॅसही जास्त लागतो. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी भांडे झाकणाने झाकून ठेवू शकता. त्यामुळे गॅसची मोठी बचत होणार आहे. यासोबतच थंड भांडे फ्रीजमधून काढल्यानंतर थेट गॅसवर ठेवू नका. ज्वालाकडे लक्ष द्या अनेक वेळा गॅस वाचवण्यासाठी लोक उच्च आचेवर अन्न शिजवतात, त्यामुळे अन्न केवळ जळतच नाही तर जास्त गॅसही लागतो. अशा परिस्थितीत गॅस वाचवण्यासाठी नेहमी मंद आचेवर अन्न शिजवा. तसेच वेळोवेळी गॅस बर्नर साफ करण्यास विसरू नका.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने पायात का घालत नाही? शास्त्रीय कारण माहिती आहे का?

संबंधित बातम्या

पूर्व-स्वयंपाकाची पूर्वतयारी करा स्वयंपाक करताना लोकांना अनेकदा इकडे-तिकडे गोष्टी शोधाव्या लागतात, त्यामुळे गॅस वाया जातो. म्हणूनच स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व साहित्य बाहेर काढून गॅसजवळ ठेवा आणि त्यानंतर गॅस सुरु करून अन्न शिजवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या