मुंबई, 21 जून : केस चांगले राहण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी डोक्याला तेला लावणे हा एक कॉमन उपाय आहे. सामान्यतः आपण केसांना तेल लावण्यासाठी मार्केटमधील हेअर ऑइल वापरतो. मात्र, आपल्याला हवे असल्यास आपण घरच्या घरी केसांसाठी एलोवेरा हेअर ऑइल देखील वापरून पाहू शकता. केसांसाठी कोरफडीचे औषधी गुणधर्म आणि फायद्यांविषयी जवळपास सर्वांनाच माहिती आहे. अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेली कोरफड केसांसाठी अत्यंत (Aloe Vera Hair Oil) फायदेशीर आहे. सर्वच हंगामात केसांना निरोगी ठेवण्यासाठी कोरफडीचे तेल उत्तम पर्याय ठरू शकते. जाणून घेऊया घरी केमिकल फ्री एलोवेरा ऑइल कसे बनवायचे आणि त्याचे काही फायदे. कोरफडीचे तेल कसे बनवायचे - कोरफडीचे तेल घरी बनवण्यासाठी कोरफडीची ताजी पाने घ्या. काठावरुन कट करा आणि वरचा थर काढा. आता कोरफडीचा लगदा काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर ते मिश्रण करून जेल बनवा. यानंतर एका पॅनमध्ये खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल गरम करा. त्यात एलोवेरा जेल मिक्स करून मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. तेल थंड झाल्यावर, सुगंधासाठी तुम्ही त्यात रोझमेरी एसेंशियल ऑयल देखील घालू शकता. हे तेल एका कुपीत भरून ठेवा. हे वाचा - हर्नियाचे ऑपरेशन झाल्यानंतर या चुका अनेकजण करतात; नंतर त्रास वाढत जातात कोरफड तेलाचा वापर - केस निरोगी ठेवण्यासाठी कोरफडीच्या तेलाने केसांना नियमित मसाज करायला विसरू नका. यासाठी प्रथम कोरफडीचे तेल गरम करा. थंड करून केसांना लावा, विशेषत महिलांनी केसांच्या भांगाच्या मध्यभागी तेल लावा. केस आणि टाळूला काही वेळ मसाज केल्यानंतर 1 तास तसेच राहू द्या. त्यानंतर सल्फेट फ्री माईल्ड शैम्पूने केस धुवा. तसेच केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावून स्वच्छ पाण्याने केस धुवावेत. हे वाचा - ग्रीन टी उपयोगी असली तरी कितीवेळा पिणं आहे फायदेशीर; दुष्परिणाम पण समजून घ्या कोरफड तेलाचे फायदे - कोरफडीचे तयार झालेल हे नैसर्गिक तेल कोणत्याही हंगामात केसांचे अनेक प्रॉब्लेम कमी करण्यास मदत करते. कोरफडीचे तेल नियमितपणे लावल्याने आपल्याला केसांच्या त्वचेचे संक्रमण, जळजळ, कोंडा आणि केस गळणे या त्रासांपासून आराम मिळेल. यामुळे केस लांब, दाट आणि मजबूत होऊ शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)