JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / केसांच्या प्रकारानुसार असा निवडा योग्य शॅम्पू, केसांच्या अर्ध्या समस्या इथेच सुटतील

केसांच्या प्रकारानुसार असा निवडा योग्य शॅम्पू, केसांच्या अर्ध्या समस्या इथेच सुटतील

केसांची स्वच्छता राखण्यासाठी शॅम्पू अत्यंत आवश्यक आहे. मात्र चुकीच्या शाम्पूचा वापर केल्याने तुमच्या केसांना खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे केस गळणे थांबवण्यासाठी तुम्हाला तुमच्या केसांसाठी योग्य शॅम्पू निवडणे आवश्यक असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 डिसेंबर : शरीराच्या स्वच्छतेसाठी ज्याप्रमाणे बॉडी वॉश आवश्यक आहे, त्याचप्रमाणे केसांच्या स्वच्छतेसाठी शॅम्पूचा वापर आवश्यक असतो. शॅम्पू केवळ केसांची स्वच्छता राखत नाही तर काहीवेळा केसांना आवश्यक पोषक तत्वे देखील पुरवतो, ज्यामुळे तुमचे केस निरोगी राहतात आणि केस गळणे देखील कमी होते. म्हणूनच या शॅम्पूची निवड अत्यंत काळजीपूर्वक करणं आवश्यक असते. तुम्हाला तुमच्या केसांचे सौंदर्य टिकून राहायचे असेल तर तुम्ही तुमचा शॅम्पू खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आज आम्ही तुमच्यासाठी शॅम्पू निवडण्याच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांनुसार आणि त्यांच्या समस्येनुसार योग्य शॅम्पू निवडू शकता.

वाढत्या वयातही चिरतरुण दिसायचंय? अशापद्धतीने केशरच्या 4 काड्याही करतील तुमची मदत

संबंधित बातम्या

तुमच्या केसांचा प्रकार जाणून घ्या स्टाइलक्रेसच्या मते, प्रत्येक केसांच्या प्रकारासाठी वेगवेगळे शॅम्पू बनवले जातात, त्यामुळे तुमच्या केसांसाठी शॅम्पू खरेदी करताना तुमच्या केसांच्या प्रकाराविषयी योग्य माहिती असली पाहिजे. समजा तुमचे केस कोरडे आहेत आणि तुम्ही केस धुण्यासाठी मॉइश्चरायझ्ड शॅम्पूचा वापर केला नाही तर तुमच्या केसांची गुणवत्ता खराब होईल.

कोरडे केस, तेलकट केस, बारीक केस, कलर ट्रिट केलेले केस, या सर्वांसाठी वेगवेगळे शॅम्पू वापरावेत. खूप रसायने असलेले शॅम्पू काही वेळा केसांसाठी हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे शॅम्पूमधील घटकांचीही काळजी घ्या. शॅम्पू बॉटलच्या लेबलवरून करा निवड जर तुमचे केस तेलकट असतील तर ते शॅम्पू घ्या ज्याच्या लेबलवर वॉल्यूमाइजिंग, स्ट्राँगिंग, बॅलन्सिंग लिहिलेले आहे. जर तुमचे केस कोरडे असतील तर ते शॅम्पू घ्या ज्याच्या लेबलवर स्मूथिंग, हायड्रेटिंग असे शब्द लिहिलेले आहेत. Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा हे पीठ; आरोग्यसाठीही फायदेशीर स्कॅल्पचा प्रकारही जाणून घ्या प्रत्येक टाळूच्या प्रकाराला वेगवेगळे पोषकतत्व आणि रसायने लागतात, त्यामुळे टाळूच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडला पाहिजे. मॉइश्चरायझिंग शॅम्पू तेलकट टाळूसाठी चांगले नसले तरी ते कोरड्या टाळूसाठी पूर्णपणे योग्य आहेत. तेलकट टाळूसाठी शॅम्पू निवडताना, व्हॉल्यूमाइजिंग, स्ट्रँडिंग आणि बॅलेंसिंग असे शब्द असलेले शॅम्पू शोधा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या