जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वाढत्या वयातही चिरतरुण दिसायचंय? अशापद्धतीने केशरच्या 4 काड्याही करतील तुमची मदत

वाढत्या वयातही चिरतरुण दिसायचंय? अशापद्धतीने केशरच्या 4 काड्याही करतील तुमची मदत

वाढत्या वयातही चिरतरुण दिसायचंय? अशापद्धतीने केशरच्या 4 काड्याही करतील तुमची मदत

केशरचा नियमित आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्वचेपासून ते हृदयापर्यंत केशर अनेक प्रकारे शरीरासाठी लाभदायक ठरते. जाणून घेऊया केशर खाण्याचे फायदे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 डिसेंबर : केशर हा एक मसाल्याचा प्रकार आहे. त्याचा उपयोग मिठाईमध्ये किंवा अन्नपदार्थांमध्ये सुगंध आणि रंगा आणण्यासाठी केला जातो. केशर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. केसरचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हंगामी आजार दूर ठेवण्यास मदत होते. एवढेच नाही तर याचा आहारात समावेश केल्याने वयापेक्षा खूप तरुण दिसण्यास मदत होते. अशा स्थितीत केशरचे फायदे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. केशरच्या फायद्यांबाबत माता आणि बाल पोषणतज्ञ डॉ. रमिता कौर यांनी इस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यांनी या व्हिडिओत काय सांगितले जाणून घेऊया. सर्वात आधी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की केशरचा आहारात समावेश केल्याने काय काय फायदे होऊ शकतात. केशरच्या सेवनाने शरीरातील वात, पित्त आणि कफ दोष संतुलित ठेवता येतात. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसेच यातील अँटी इंफ्लामेटरी आणि अँटी फंगल गुणधर्मांमुळे संसर्गापासून तुमचे संरक्षण होते. केशरचा आहारात समावेश करण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंतु ते पाणी आणि दूधात घालून पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते.

Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा हे पीठ; आरोग्यसाठीही फायदेशीर

केशर तरुण्य टिकवते तारुण्य टिकावण्यासाठी तुम्ही दैनंदिन आहारात केशरचा समावेश करू शकता. नियमित केशरच्या सेवनाने तुम्ही वयापेक्षा 5 ते 10 वर्षे तरूण दिसू शकता. कारण यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा तजेलदार बनते, तसेच फ्रिकल्स, डाग आणि मुरुम देखील कमी होतात. केशरमध्ये कॅरोटीनोइड्स, अँटी-बॅक्टेरियल, अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. यामुळे ते त्वचेसाठी खूप प्रभावी ठरते.

News18लोकमत
News18लोकमत

वापर कसा कराल? दूधामध्ये किंवा हर्बल टीमध्ये केशरच्या 1 ते 2 स्ट्रँड्स घालून ते भिजवून पिऊ शकता. तसेच मिठाईमध्ये देखील याचा वापर करू शकता. याशिवाय तुम्ही रात्री केशरच्या 1 ते 2 काड्या अर्धा कप पाण्यात भिजवायला ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी पिऊ शकता. मात्र गरोदर माता आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी हा उपाय करू नये असा सल्ला देण्यात येतो. शरीर सुडौल-फिट राखण्यासाठी रोजच्या आहारात फक्त इतका करा बदल केशरचे इतर फायदे - केशर खाल्ल्याने किंवा दुधाक घालून प्यायल्याने चिंता दूर होते आणि मूड सुधारतो. - मासिक पाळीपूर्वीची लक्षणे जसे की क्रँम्स, मूड बदलणे इत्यादी समस्याांपासून आराम मिळतो. - भूक कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास देखील केशर मदत करते. - हार्ट स्ट्रोक टाळण्यासाठी रक्तदाब कमी करण्यासाठी देखील केशरचा फायदा होतो. - याशिवाय केशरमुळे त्वचेचा पोत सुधारतो, पिगमेंटेशन, डाग आणि पुरळ कमी होतात. - तसेच केशर कॉर्टिसोलची पातळी कमी करते, शांत झोप लागण्यासाठी देखील हे फायदेशीर ठरते.

जाहिरात

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात