दररोज किती तास झोपावे
नवी दिल्ली, 14 जानेवारी : आपल्याला रात्री पुरेशी झोप न मिळण्याची अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, परीक्षा, ऑफिस मीटिंग किंवा इतर कार्यक्रमांची तयारी करणाऱ्या व्यक्ती कमी झोप घेतात. विविध रिसर्च स्टडीजनुसार, चांगल्या आरोग्यासाठी किमान सात तासांची झोप आवश्यक आहे. अलीकडच्या काळात झालेल्या पीएलओएस मेडिसिन स्टडीमध्ये असं आढळलं आहे, की दररोज रात्री सात तासांपेक्षा कमी झोप घेणं एखाद्याच्या आरोग्यासाठी फार हानिकारक ठरू शकतं. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ब्रिटीश नागरी सेवेतल्या व्यक्तींवर करण्यात आलेल्या या अभ्यासात असं निदर्शनास आलं, की ज्या व्यक्ती पाच तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोपतात त्यांना अनेक आजार होण्याचा धोका जास्त असतो. या तुलनेत, ज्या व्यक्ती नियमित सात तास झोपतात त्यांना विविध आजार होण्याचा धोका 30 टक्क्यांनी कमी असतो. या अभ्यासात असंही आढळलं, की वयाच्या पन्नाशीमध्ये कमी झोपेमुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे, आपलं वय आणि आणखी काही घटकांच्या आधारावर आपल्यासाठी किती प्रमाणात झोप आवश्यक आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. डॉक्टर ऑफ मेडिसिन एरिक जे. ओल्सन यांच्या मते, चार ते 12 महिने वयोगटातल्या बालकांसाठी दिवसभरात 12 ते 16 तासांची झोप आवश्यक असते. एक ते दोन वर्षांच्या मुलांसाठी 11 ते 14 तास झोप गरजेची असते. तीन ते पाच वर्षं वयोगटातल्या मुलांनी 10 ते 13 तास झोपलं पाहिजे. सहा ते बारा वर्षं वयोगटातल्या मुलांनी नऊ ते 12 तास झोप घेणं गरजेचं आहे. 13 ते 18 वर्षं वयोगटातील मुलांनी आठ ते 10 तास झोपलं पाहिजे.
आपल्या वयाव्यतिरिक्त जे घटक चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात, त्यामध्ये झोपेच्या गुणवत्तेचा समावेश आहे. तुमची झोप वारंवार खंडित होत असल्यास तुम्हाला चांगल्या गुणवत्तेची पुरेशी झोप मिळत नाही. तुमच्या झोपेचं प्रमाण आणि गुणवत्ता दोन्हीही महत्त्वाचं आहे. पुरेशा झोपेच्या अभावाचा आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. तुम्ही कमी वेळ झोपत असाल, तर तुम्ही तुमची झोपेची वेळ वाढवली पाहिजे. हे वाचा - हिवाळ्यात ग्लोइंग लूकसाठी स्कीन व्हाइटनिंग आणि ब्राइटनिंग क्रीम ठरते फायदेशीर शिफारस केलेल्या प्रमाणात नियमितपणे झोप घेतल्यास आरोग्यात अनेक सुधारणा होतात. पुरेशा झोपेमुळे तुमचं वर्तन, शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती, भावनिक नियंत्रण, जीवनाची मानसिक आणि शारीरिक आरोग्याची गुवणवत्ता यांमध्ये सकारात्मक बदल होतात.