मुंबई, 14 जानेवारी: हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. थंडीमुळे पाणी जास्त प्यायलं जात नाही. तसंच कोरडी व बोचरी थंड हवा त्वचा आणखीनच रुक्ष बनवते. अशा परिस्थितीत चांगला फ्लॉ-लेस लूक हवा असेल, तर स्कीन व्हाइटनिंग क्रीम, ब्राइटनिंग क्रीम व अँटी एजिंग क्रीम उपयोगी पडतात. ही क्रीम्स सगळ्या प्रकारच्या त्वचेला चालतात. या क्रीम्समध्ये क आणि ई जीवनसत्त्वं असल्याने त्वचेला पोषणमूल्यं मिळतात. तसंच ही क्रीम्स त्वचेचं थंडीपासून संरक्षणही करतात. Trycone Whitening Ageing Vitamin हे क्रीम नैसर्गिक एक्स्ट्रॅक्ट्सपासून बनलेलं आहे. वाढत्या वयामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. यूव्ही किरणांपासून त्वचेचा बचाव हे क्रीम करतं. या क्रीममध्ये जीवनसत्त्व क आणि ई असतं. स्त्रियांप्रमाणे पुरुषही याचा वापर करू शकतात. कोणत्याही प्रकारच्या त्वचेला ते योग्य ठरू शकतं. तसंच या क्रीममुळे त्वचेवर कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत. हेही वाचा - Mental Health : एक्सरसाइज, पॅशन आणि हेल्दी रिलेशनशिप; मानसिक आरोग्यासाठी आहे वरदान Lotus Herbals Whiteglow याचं जेल व क्रीमी टेक्श्चर त्वचेला ओलावा देतं. यात मिल्क एन्झाइम्स भरपूर असतात. हे क्रीम चिकट नसल्यानं त्वचेला तेलकट बनवत नाही. चेहऱ्यावरचे जुने डाग घालवण्यासाठी हे क्रीम उपयोगी पडेल. तसंच स्किन टोन सुधारण्यासही मदत करेल. इतकंच नाही, तर त्वचेचा रंग एकसारखा करण्यासही मदत करतं. Jezara Whitening Cream स्त्रिया व पुरुष दोघांनाही हे क्रीम लावता येऊ शकतं. एखाद्या ठिकाणी काळी व इतर ठिकाणी गोरी असणारी त्वचा एकसारख्या रंगानं उजळवण्याचं काम हे क्रीम करतं. तसंच वाढत्या वयाच्या खुणा लपवण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा अशा कोणत्याही त्वचेवर हे क्रीम लावता येऊ शकेल. तोंड धुतल्यावर हे क्रीम लावून हलक्या हातानं मसाज करा. हेही वाचा - हिवाळ्यात तुमचे पाय बर्फासारखे थंड असतात का? या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण Intensive Whitening Cream पिगमेंटेशनचा त्रास असेल, तर हे क्रीम नक्कीच वापरून पाहा. यामुळे त्वचा एकसारख्या पद्धतीनं उजळते. हे क्रीम रात्रीही लावू शकता. सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणत्याही ऋतूत लावता येईल असं हे क्रीम आहे. स्त्री व पुरुष दोघंही हे क्रीम वापरू शकतात. थंडीच्या दिवसांत त्वचा फुटण्याची समस्या या क्रीममुळे आटोक्यात येऊ शकते. Goree Day And Night Cream या क्रीमचा उपयोग चेहऱ्यावरचे काळे डाग, लाल डाग, टॅनिंग, अॅक्ने, कांजिण्यांचे डाग घालवण्यासाठी होऊ शकतो. हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेला कोणत्याही ऋतूत लावलं तरी चालतं. चेहऱ्यावरच्या डागांबरोबरच हे क्रीम चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी करतं. या क्रीममुळे त्वचेला ओलावा मिळतो व त्वचा चांगली होते. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला हे क्रीम लावू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.