JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोनामुळे अनेकांवर मानसिक परिणाम, हॉटेल्सनं तणाव कमी करण्यासाठी सुरू केली खास सुविधा

कोरोनामुळे अनेकांवर मानसिक परिणाम, हॉटेल्सनं तणाव कमी करण्यासाठी सुरू केली खास सुविधा

संपूर्ण जगाला कोरोना विषाणू महामारीने (Effect of Corona Virus) एक नवी जीवनपद्धतीच दिली आहे. यावर उपाय म्हणून हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल व्यवसायाने एक तोडगा शोधला आहे. तो म्हणजे स्लिपकेशन (Sleepcation).

जाहिरात

अपुरी झोप झाल्यामुळे कितीतरी आजारांना आपण निमंत्रण (Problems related to sleep) देत आहोत ही गोष्ट आपल्याला लवकर लक्षात येत नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 31 मार्च : संपूर्ण जगाला कोरोना विषाणू महामारीने (Effect of Corona Virus) एक नवी जीवनपद्धतीच दिली आहे. त्याला आपण न्यू नॉर्मल म्हणायला सुरुवात करूनही आता सहा-आठ महिने होत आले. जसा जगण्यावर या महामारीचा परिणाम झाला तसा मनांवर पण प्रचंड परिणाम झाला. मानसिक अस्वस्थता वाढली, झोप गाढ लागेना, झोपच लागेना अशा तक्रारी अगदी प्रत्येकच जण करायला लागला. वर्क फ्रॉम होम (Work From Home) जीवनशैलीमुळे घरातूनच काम केलं तरीही ते सतत करायला लागलं आणि बसायला लागल्यामुळे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे शारीरिक व्याधीही जडल्या. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर हळूहळू पर्यटनस्थळं उघडू लागली आणि लोकंही तिकडे जाऊन लागले. पण पर्यटकांची संख्या खूपच कमी होती. यावर उपाय म्हणून हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल व्यवसायाने एक तोडगा शोधला आहे. तो म्हणजे स्लिपकेशन (Sleepcation). स्लिपकेशन म्हणजे काय? स्लिपकेशनम म्हणजे विविध कारणांमुळे ग्रस्त असलेल्या आणि फिरायला आलेल्या आपल्या पर्यटकांना आपल्या हॉटेलमध्ये, रिसॉर्टमध्ये चांगली झोप मिळावी यासाठी प्रयत्न करणं. वर्क फ्रॉम होम किंवा कामाच्या तणावामुळे त्रस्त ग्राहकाला जर स्पाची सुविधा हॉटेलमध्ये मिळाली तर त्याचं मन शांत होऊ शकतं, म्हणून ग्राहकांना स्पाची सेवा, झोपताना अधिक दर्जेदार देणं त्याचबरोबर त्याला झोप येण्यास मदत करेल असा मेन्यू देणं हे सर्व हॉटेल्स करत आहेत. यालाच स्लिपकेशन म्हणतात असं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. बेंगळुरूतील आयटीसी लाईफ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी सेंटर इन्स्टिट्युटने नुकताच झोपेबद्दल एक सर्व्हे केला. आयटीसी या उद्योग समूहाची देशभरात मोठी हॉटेल्सची चेन आहे. त्यांनी खास हा सर्व्हे करून घेतला. त्यातून असं लक्षात आलं की हॉटेल्समध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या आरोग्य पॅकेजमुळे ग्राहकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास तसंच काम आणि झोपेचे पॅटर्न बदलण्यास खूप मदत होत आहे. विशेष करून आताच्या कठीण घडीला तर याचा खूपच चांगला परिणाम होत आहे असंही या सर्व्हेचं निरीक्षण आहे. आता हळूहळू पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट जगभर येताना दिसत असली तरीही लोक अशा स्लिपकेशनच्या संकल्पनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. हळूहळू अनेक प्रोफेशनल्स स्लिपकेशनची संकल्पना स्वीकारत आहेत. या संकल्पनेमुळे त्यांची काम करण्याची क्षमता आणि घर-ऑफिस यातला समतोल राखायला त्यांना मदत होत आहे. झोपेवर का होतोय परिणाम? वर्क फ्रॉम होममध्ये सतत कार्यरत रहायचं, दिवसरात्र शिफ्ट करायच्या त्यामुळे झोपेचं खोबरं होतं. त्याचबरोबर जागरण झालं की आरोग्यास हानीकारक जंक फूड खाल्लं जातं. या सगळ्या सवयींमुळे झोपेवर प्रचंड परिणाम होतो. देशात आणि परदेशांत झोपेवर परिणाम होत आहे त्यामुळे हॉस्पिटॅलिटी उद्योगातील लोक अशा ग्राहकांना टारगेट करत आहेत की जे उत्तम झोपेला अनन्यसाधारण महत्त्व देतात. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असं लक्षात आलं की सध्याच्या कोविडच्या काळात 10 पैकी 1 जणंच सांगतो की त्याला उत्तम झोप येत आहे. या सर्व्हेत 70 हजार जणांना प्रश्न विचारण्यात आले त्यापैकी केवळ 7.7 टक्के लोकांनीच उत्तम झोप लागत असल्याचं सांगितलं. या अभ्यासातील प्रमुख संशोधक डॉ. डेसी फॅनकोर्ट यांच्या म्हणण्यानुसार अल्प उत्पन्न गटातील किंवा शारीरिक किंवा मानसिक ताण असलेल्या व्यक्ती तसंच काही अल्पसंख्य गटातील व्यक्ती यांच्या झोपेवर महामारीचा प्रचंड परिणाम झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या