JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चवीला गोड पण सौंदर्यासाठी ठरतेय कडू; साखरेचे तुम्हाला माहीत नसतील असे दुष्परिणाम

चवीला गोड पण सौंदर्यासाठी ठरतेय कडू; साखरेचे तुम्हाला माहीत नसतील असे दुष्परिणाम

आपल्याकडे कोणतीही आनंदाची बातमी गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय (Eating More Sweets) पूर्ण होत नाही. तसेच कोणत्याही सण समारंभात, कार्यक्रमात आपल्याकडे आवर्जून गोड पदार्थ केले जातात. एकूणच काय तर आपल्याकडे गोड खाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.

जाहिरात

धार्मिक श्रद्धेनुसार साखर खाली पडणे अप्रिय बातमी मिळण्याचे संकेत देते. साखर देवतांना भोग म्हणून अर्पण केली जाते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : आपल्यापैकी बहुतांश लोकांना जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची सवय असते. गोड खाणाऱ्या लोकांची कुठेच कमी नसते. केवळ जेवण झाल्यानंतरच नाही तर आपण कधी गोड पदार्थ पाहू शकतो, गोड चहा पिऊ शकतो. आपल्याकडे कोणतीही आनंदाची बातमी गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय (Eating More Sweets) पूर्ण होत नाही. तसेच कोणत्याही सण समारंभात, कार्यक्रमात आपल्याकडे आवर्जून गोड पदार्थ केले जातात. एकूणच काय तर आपल्याकडे गोड खाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यातही आपण साखर म्हणजेच व्हाईट शुगर (White Sugar) जास्त प्रमाणात खातो. Yoga Day 2022: मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी Yoga कराच; पण आसनं करताना घ्या ही काळजी या व्हाईट शुगरमुळे आपल्या शरीराला अनेक त्रासाचा सामना करावा लागतो. जसे की वजन वाढणे, हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, फॅटी लिव्हर (White Sugar Leads Can Cause Weight Gain, High Blood Pressure, Fatty Liver) या समस्या उद्भवतात. तुम्ही व्हाईट शुगर खाणे सोडल्यानंतर अगदी पहिल्याच दिवसापासून तुम्हाला फरक जाणवेल. तुम्हाला दिवसभर अधिक उत्साही आणि थोडे हलकेही वाटेल. साखर खाणे सोडण्याचा एक सर्वश्रुत आणि महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी होणे. तुम्ही साखर खाणे सोडून त्यासोबत हेल्दी डाएट फॉलो केले आणि नियमित व्यायाम केला तर काही दिवसातच तुमचे वजन लक्षणीयरीत्या कमी होते. ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा ही साखर केवळ आजारांचा आमंत्रण देते असे नाही. तर यामुळे आपल्याला त्वचेसंबंधीही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि त्वचेचा पोत खराब होऊ शकतो. साखर खाणे सोडल्यानंतर केवळ आठवडाभरात तुमची त्वचा स्वच्छ आणि नितळ होईल. तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम कमी होतील आणि तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. त्यामुळे पांढरी साखर न खाणे तुमच्या आरोग्यासाठी कधीही चांगले असते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या