मुंबई, 15 एप्रिल : आपल्याकडे जेवनासंबंधित अनेक चांगल्या सवयी आणि काही नियम आहेत. पूर्वीच्या काळापासून जेवताना बसताना हात धुवून जेवायला बसने. ताटातील सर्व पदार्थ संपवणे. एवढेच नाही तर ताटात कोणत्या बाजूला कोणता पदार्थ वाढावा यासाठीदेखील नियम आहेत. एक वाक्य आपण आपल्या घरात नेहमी ऐकत असतो की, कढईत जेवण करू नये. जुने जाणते लोक सांगतात म्हणून आपल्याला कदाचित ही निव्वळ अंधश्रद्धा वाटू शकते. परंतु यामागे वैज्ञानिक कारणदेखील आहे.जाणून घेऊया यामागचे वैज्ञानिक कारण.. कढईत जेवण न करण्यामागचे वैज्ञानिक कारण कढईत कुणीही जेवण करू नये म्हणून जुन्या काळात असे सांगितले जायचे की, एखाद्या लग्न न व्यक्तीने जर कढईत जेवण केले तर त्याच्या लग्नात पाऊस येईल आणि जर एखाद्या विवाहित व्यक्तीने असे केले तर त्याला गरिबीचा सामना करावा लागेल. मात्र यामागचे वैज्ञानिक कारण असे होते की, लोकांनी कढईत अन्न खाण्याची चूक करू नये आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी.
नुसतं एकदा बघितलं तरी मनात काय होतं अन् काय नाय! प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं माहितीये का?कढईत जेवण केल्याने वाढतो पोटासंबंधित आजारांचा धोका स्वच्छतेच्या कारणांमुळे आजही लोक कढईत अन्न खात नाहीत. कारण कढई खूप स्वच्छ करूनही करूनही आदल्या दिवशीच्या अन्नाचे काही कण कढईत राहण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कढईत अन्न खाल्ल्याने त्यात राहिलेला शिळा भाग पोटात जाऊ शकतो. ज्यामुळे व्यक्तीला पोटासंबंधित त्रासाचा सामना करावा लागू शकतो.
पूर्वीच्या काळी यामुळे लोक कढईत जेवण नसत झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, कढईत जेऊ नये असे सांगण्यामागे पूर्वी काही कारणं असायची. पूर्वीच्याकाळी मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवले जायचे आणि हे जेवण लवकर त्या भांड्यांमधून बाहेर काढले नाही. तर ती कढई किंवा भांडी तेल आणि मसाल्यांनी खराब व्हायची. कढईतून लवकर अन्न काढून ती कढई लगेच पाण्यात टाकली जायची आणि नंतर राख किंवा मातीने स्वच्छ केली जायची. त्यामुळे कढईत जास्त काळ पदार्थ राहू नये ते लवकरात लवकर खाल्ले जावे किंवा ताटात घेऊन खावे अशी मान्यता होती. ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)