Home /News /lifestyle /

नुसतं एकदा बघितलं तरी मनात काय होतं अन् काय नाय! प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं माहितीये का?

नुसतं एकदा बघितलं तरी मनात काय होतं अन् काय नाय! प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं माहितीये का?

अनेकवेळा आपल्या वागण्यावरून आपल्याला प्रेम आणि आकर्षण (Attraction) यातला फरक समजत नाही. तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टी अनुभवता याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

    मुंबई, 13 जुलै : कोणी तरी समोर आल्यावर तुम्ही लाजता का? किंवा एखाद्याला दुरून पाहिल्यावर तुमचं मन प्रसन्न होऊन मनात फुलपाखरं उडू लागतात का? कोणाला तरी पाहिल्यावर पोटात गुदगुल्या होत असल्यासारखं वाटतं का? या प्रश्नांची उत्तरं ‘होय’ अशी असतील तर त्याचा अर्थ तुम्ही प्रेमात पडला आहात. कारण या सर्व गोष्टी प्रेमात पडल्याचे संकेत देतात. तुम्हाला कोणाहीबद्दल असं वाटत असेल तर ते नक्कीच प्रेम (Love) आहे. कधी कधी चांगले मित्रही (Friends) एकमेकांच्या प्रेमात पडतात; मात्र एकमेकांसोबत वेळ घालवताना अनेकदा ते प्रेमात पडल्याच्या भावनेपासून अनभिज्ञ असतात. बऱ्याचदा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलोय किंवा आपल्याला कोणी तरी आवडू लागलंय याची आपल्याला कल्पना नसते; पण जेव्हा प्रेम असतं तेव्हा त्याचे अनेक संकेत असतात; पण ते समजणं थोडं अवघड जातं. अनेकवेळा आपल्या वागण्यावरून आपल्याला प्रेम आणि आकर्षण (Attraction) यातला फरक समजत नाही. तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर तुम्ही कारण नसताना खूश व्हाल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर हसू येईल. मनात प्रेमाची घंटी कधी आणि कशी वाजते त्याबद्दल थोडं जाणून घेऊ या. कदाचित त्यामुळे तुम्हालाही तुमचं प्रेम ओळखण्यात मदत होईल. मनातलं प्रेम कसं ओळखायचं? तुम्ही प्रेमात पडला असाल तर तुम्ही सतत त्या व्यक्तीच्या विचारात हरवून जाल. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला त्या व्यक्तीचं बोलणं आणि कृती आठवत राहतील. तुम्हाला त्याची आठवण आल्यावर तर तुम्ही स्वतःशीच बोलायला लागाल. तुम्हाला या सर्व गोष्टी जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात. स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीची वाटते काळजी जेव्हा आपल्याला कुणी तरी आवडतं किंवा आपण प्रेमात पडतो तेव्हा तो किंवा ती आपल्यासाठी सर्वस्व बनते. स्वत:पेक्षा जास्त तुम्हाला त्याच्या खाण्या-पिण्याची जास्त काळजी वाटू लागते. त्याच्याबद्दल कोणीही वाईट बोललेलं तुम्हाला आवडत नाही. या गोष्टी तुम्हाला जाणवत असतील तर समजून घ्या, की तुम्ही प्रेमात पडला आहात. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर संगीत जास्त आवडू लागणं एखाद्याच्या विचारात बुडून गेल्यावर संगीताचा (Music) आसरा घेतला जातो. बऱ्याचदा समोरच्याच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आपण गाणी निवडतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा रोमँटिक गाणी आवडतात. तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडलात तर तुमची प्लेलिस्ट आपोआप रोमँटिक गाण्यांनी भरून जाईल. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा मित्रांसोबत भावना शेअर करणं बहुतांश व्यक्ती त्यांच्या मनातल्या गोष्टी मित्रांना सांगतात. प्रेमात पडण्याची कोणतीही खास अशी पद्धत नाही. त्यामुळे तुमचं कोणावर प्रेम असेल, तर काही काळानंतर तुम्ही या गोष्टी तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर कराल. यावरून तुम्हाला कळेल, की तुम्ही खरंच प्रेमात पडला आहात की ते फक्त आकर्षण आहे.
    First published:

    Tags: Love, Relation, Relationship tips

    पुढील बातम्या