नवी दिल्ली, 25 मे : आजकालच्या जीवनशैलीत निद्रानाश (Insomnia) ही अनेक लोकांसाठी एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. नीट झोप लागणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. निरोगी शरीरासाठी उत्तम आणि पूर्ण झोपेचे महत्त्व कोणाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. निद्रानाश म्हणजेच झोप न लागणे हा आजार मानला जातो. निद्रानाशामुळे आरोग्याला होणारे नुकसान अनेक अभ्यासांमध्ये नोंदवले गेले आहे, परंतु आता फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अलीकडील अभ्यासा त, निद्रानाशाची लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्याने मानसिक समस्यांशी संबंधित गंभीर धोका असल्याचे समोर आले आहे. जर्नल ऑफ एजिंग अँड हेल्थमध्ये (Journal of Aging and Health) प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष असं देखील सांगतात की, निद्रानाशाची लक्षणे तरुण वयात किंवा प्रौढ वयात दिसू लागली तर उतावयात त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. जितका जास्त काळ त्रास, तितका आजार मोठा - हेलसिंकी विद्यापीठातील संशोधक अँटी इथोलेन यांच्या मते, ‘नीट झोप न लागणं किंवा निद्रानाशाची समस्या जितकी जास्त काळ टिकून राहते, तितकेच त्याचे मेंदूवर दुष्परिणाम होतात. अशा स्थितीत व्यक्तीची आकलनशक्ती कमकुवत होऊ लागते. निद्रानाशाचा मेंदूच्या काम करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो हे काही अभ्यासांतून समोर आले असले तरी, या अभ्यासाची विशेष बाब म्हणजे 15 ते 17 वर्षांच्या फॉलोअपच्या आधारे झोपेचा मेंदूवर कसा परिणाम होतो हे तपासले आहे. हे वाचा - मंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात तज्ज्ञ काय म्हणतात - निद्रानाशाची लक्षणे सुधारली तर मेंदूला होणारे नुकसानही कमी करता येऊ शकते, असे या अभ्यासात आढळून आले आहे. हेलसिंकी विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. लालुक्का यांनी सांगितले की, निष्कर्ष पाहता हे स्पष्ट होते की, निद्रानाशाची लक्षणे जितक्या लवकर ओळखली जातील आणि त्यावर उपचार केले जातील तितके वृद्धापकाळात येणाऱ्या अडचणी टाळता येतील. हे वाचा - कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा ते पुढे म्हणाले, “जरी ताज्या अभ्यासात फक्त सेल्फ रिपोर्ट केलेली स्मृतीविषयी लक्षणे ध्यानात घेतली जाऊ शकतात, परंतु निद्रानाशावर उपचार केल्याने स्मरणशक्तीशी संबंधित रोगांची गती कमी होते का? यावर पुढील अभ्यासात अधिक संशोधन करणे गरजेचे आहे.