मुंबई, 08 जून : पाणी ही आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. आपल्या शरीरात 70 टक्के पाणीच असते. पुरेसं पाणी पिणं आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी पाणी मौल्यवान आहे. भरपूर पाणी प्यायल्याने चेहराही फ्रेश दिसतो. पाणी पिण्याचे महत्त्व माहीत असलेले अनेकजण नकळतपणे जास्त पाणी पितात किंवा काहीजण स्कीनसाठी म्हणून जास्त पाणी पितात. परंतु, जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीराचे खूप नुकसान होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने लठ्ठपणा, किडनी विकार आणि अनेक गंभीर आजार होऊ (Drink excessive water can harm your health) शकतात. शरीरात सूज - टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव अधिक पातळ होतात. त्यामुळे शरीरातील सोडियमची पातळीही कमी होऊ लागते, त्यामुळे पेशींमध्ये सूज येते. त्यात मेंदूच्या पेशींचाही समावेश होतो. त्याचा मेंदूच्या चेतनेवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी झाल्यामुळे शरीरात हायपोनेट्रेमियाची समस्याही सुरू होऊ शकते. हायपोनेट्रेमियामध्ये, शरीरात खूप पाणी साचते, ज्यामुळे मळमळ, डोकेदुखी, थकवा जाणवतो. विशेष म्हणजे, सोडियम इलेक्ट्रोलाइट पाणी आणि इतर पदार्थांची पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. रक्तातील सोडियमचे प्रमाण 135 (mEq/L) पेक्षा कमी असल्यास अशा प्रकारच्या समस्येचा सामना केला जाऊ शकतो. हायपोनेट्रेमिया ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. ज्यांना हायपोनेट्रेमियाची लक्षणे दिसत आहेत त्यांनी ताबडतोब डॉक्टरांकडे नेले पाहिजे. हायपोनेट्रेमियाची लक्षणे काय आहेत - - अस्वस्थ असणे - बेशुद्ध होणे - अशक्त वाटणे - अंग दुखी - तीव्र डोकेदुखी - मळमळ - उलट्या होणे हे वाचा - पिंपल्स, काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा रस आहे फायदेशीर; असा करा घरगुती उपाय दररोज किती पाणी प्यावे - शरीरातील कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक ठरतो. योग्य दिनचर्या पाळणे गरजेचे असले तरी खूप कडक नियम असू नयेत. लवचिक दिनचर्या असल्यास एखादी गोष्ट जास्त खाण्या-पिण्याचा प्रकार होत नाही. आपल्या आरोग्यासाठी किती पाणी पिणे चांगले आहे, हे प्रत्येक व्यक्तीच्या वैद्यकीय स्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे स्वत:च्या मर्जीनुसार निर्णय घेण्याऐवजी डॉक्टरांशी संपर्क साधा, तुमची प्रकृती जाणून घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने तुमच्या दिनचर्येत गरजेनुसार पाणी प्या. हे वाचा - 20 ते 25 वर्षांच्या तरुणांनी आहारात घ्यावेत हे पदार्थ; राहाल दीर्घायुष्य निरोगी यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंजिनीअरिंग अँड मेडिसिनने दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांसाठी - दररोज सुमारे 15.5 कप (3.7 लीटर) द्रव महिलांसाठी - दररोज सुमारे 11.5 कप (2.7 लिटर) द्रव