JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Tamarind leaf Tea: चिंचेच्या पानांचा चहा कधी घेतलाय का? हे फायदे समजल्यावर नक्की घ्याल

Tamarind leaf Tea: चिंचेच्या पानांचा चहा कधी घेतलाय का? हे फायदे समजल्यावर नक्की घ्याल

प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत चिंचेच्या पानांचा चहा खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया हा चहा कसा बनवला जातो आणि त्याचे फायदे (Tamarind leaf Tea) काय आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून: चिंच ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु चिंचेच्या पानांचा चहा देखील फायदेशीर आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. आता तुम्ही विचार करत असाल की चिंचेच्या पानांचा चहा कसा बनवला जातो आणि त्यातून कोणते फायदे मिळतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत हा चहा खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया हा चहा कसा बनवला जातो आणि त्याचे फायदे (Tamarind leaf Tea) काय आहेत. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहील - झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, चिंचेच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात हे सर्वांनाच माहीत आहे, एक चांगले आणि दुसरे खराब, जर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जास्त झाले तर हृदयाशी संबंधित समस्या सुरू होतात. अशावेळी चिंचेच्या पानांचा चहा फायदेशीर ठरतो. वजन नियंत्रणात राहील - बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोक लठ्ठपणाचे बळी ठरतात. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला वजन कमी करायचे असते. ज्यांनी वजन कमी करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करूनही परिणाम दिसलेला नाही, त्यांच्यासाठी चिंचेचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. वजन कमी करायचे असेल तर चिंचेचा चहा नियमित प्या. हे वाचा -  पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार रक्तातील साखर नियंत्रित राहील - चिंचेच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात. हे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यास प्रभावीपणे मदत करतात. यासोबतच चिंचेच्या अर्कामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात, जे आपल्याला मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. हे वाचा -  Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम पचनक्रियाही सुधारेल - चिंचेच्या पानांमध्ये असलेली पोषक तत्वे पाचक रसांना (पित्त ऍसिड) उत्तेजित करतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. म्हणजेच या चहाचे सेवन केल्यास पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळते. या चहाचे नियमित सेवन केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या