GENDER CHANGE
मुंबई ११ नोव्हेंबर : प्रेमात लोक काय करतील याचा काही नेम नाही. बऱ्याचदा अशी प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये लोकांनी प्रेमात अशा काही विचित्र गोष्टी केल्या आहेत. ज्या सर्वसामान्यांसाठी आश्चर्यकार असतात. हल्लीच एक ताज प्रकरण राजस्थानमधून समोर आलं आहे. ज्यामध्ये एका महिला शिक्षिकेला आपली एक विद्यार्थीनी आवडते. म्हणून मग तिने आपलं जेंडर बदललं. इतकच नाही, तर त्या दोघांनी लग्न देखील केलं आहे. त्यांच्या लग्नानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. ज्यानंतर अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थीत होऊ लागले. जेंडर चेंज नक्की काय असतं? ते कसं केलं जातं किंवा ते केल्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय बदल होतात? लोकांनी यापद्धतीने प्रश्न गुगल शोधायला सुरुवात केली. तर चला याप्रश्नांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. लिंग बदल सोपं नाही डॉक्टर सांगतात की ज्या लोकांना लिंग डिसफोरिया आहे, ते अशा प्रकारचे ऑपरेशन करतात. यामध्ये एखाद्या मुलाला मुलीसारखे तर मुलीला मुलासारखे जगायचे असते. 12 ते 16 वर्षे वयोगटातील अनेक मुला-मुलींमध्ये जेंडर डिसफोरियाची लक्षणे सुरू होतात, परंतु समाजाच्या भीतीमुळे ते या बदलांबद्दल पालकांना सांगण्यास घाबरतात. हे ही वाचा : भारतीय रेल्वेमध्ये 56 वर्षापासून नव्हतं टॉयलेट, धोतराच्या ‘त्या’ कॉन्ट्रोवर्सीमुळे सुरु झाली सुविधा आजही अशी अनेक मुलं-मुली आहेत, जे या समस्ये सोबतच आयुष्य जगत आहेत, पण ही गोष्ट कोणालाही सांगायला घाबरतात. पण जे धाडस दाखवतात ते पाऊल उचलतात. ते लिंग बदलासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात. मात्र, लिंग बदलणाऱ्यांकडे समाजात वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते आणि लोकही त्यांना अनेक प्रश्न विचारतात. लिंग बदलण्याची प्रक्रिया कशी होते? लिंग बदल शस्त्रक्रिया हे एक आव्हानात्मक काम आहे. त्याची किंमतही लाखांत असून ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मानसिक तयारी करावी लागते. ही शस्त्रक्रिया सर्वत्र उपलब्ध नाही. केवळ मेट्रो शहरातील काही रुग्णालयांमध्ये असे सर्जन आहेत जे लिंग बदलण्याची प्रक्रिया शस्त्रक्रिया करू शकतात. लिंग बदलण्यासाठी या ऑपरेशनचे अनेक स्तर आहेत. ही प्रक्रिया खूप दीर्घकाळ चालते. महिलेला पुरुष बनण्यासाठी सुमारे 32 प्रकारच्या प्रक्रियेतून जावे लागेल. तर पुरुषाला स्त्री बनण्याचे 18 टप्पे आहेत. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहेत की नाही हेही डॉक्टर बघतात. यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली जाते. यासोबतच शरीरात कोणताही गंभीर आजार नसल्याचेही तपासले जाते. हार्मोनल बदलांपासून सुरुवात सर्व प्रथम, डॉक्टर एक मानसिक चाचणी करतात. यानंतर उपचारासाठी हार्मोन थेरपी सुरू केली जाते. म्हणजेच ज्या मुलाला मुलीच्या संप्रेरकाची गरज असते, तो त्याच्या शरीरात इंजेक्शन आणि औषधांद्वारे पोचवला जातो. या इंजेक्शनचे सुमारे तीन ते चार डोस दिल्यानंतर शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. त्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू होते. पुढची स्टेप गुप्तांगाशी संबंधीत यामध्ये स्त्री किंवा पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा आणि चेहऱ्याचा आकार बदलला जातो. स्त्रीपासून पुरुषात संक्रमण करताना, प्रथम स्तन काढून टाकले जाते आणि पुरुषाचा खाजगी भाग विकसित केला जातो.
तर पुरुषातून स्त्री बनताना स्त्रीचे अवयव त्याच्या शरीरातून घेतलेल्या हार्मोनल्सपासून बनवले जातात. यात ब्रेस्ट आणि प्रायव्हेट पार्टचा समावेश आहे. स्तनासाठी तीन ते चार तासांची स्वतंत्र शस्त्रक्रिया करावी लागते. चार ते पाच महिन्यांच्या अंतरानंतरच ही शस्त्रक्रिया केली जाते. तसेच यासाठी अनेक डॉक्टर आणि एक्सपर्टची मदत घेतली जाते. कोणत्या वयापासून करता येतं? 21 वर्षापासून जास्त वयाचे लोक ही सर्जरी करु शकतात. तरी 21 पेक्षा कमीवयाचे लोक हे पालकांच्या संमतीने करु शकतात, पण आतापर्यंत या वयापेक्षा कमी लोकांनी ही सर्जरी केल्याच्या केसेसे समोर आलेल्या नाहीत. याची किंमत रोपोर्टनुसार भारतामध्ये याची किंमत २ लाख ते ७ लाख इतकी आहे. डॉक्टर प्रत्येक सेशनला जवळ-जवळ २ ते ५ हजार इतकी फी आकारतात. तरी प्रत्येक हॉस्पीटनुसार ही फी बदलत राहिल.