ऑनलाईन डिलिव्हरी बॉक्स तपकिरी रंगाचा का असतो?

आणखी पाहा...!

सणासुदीच्या काळात तर ऑनलाईन शॉपिंग कंपन्या भरभरुन डिस्काउंट्स आणि ऑफर्स देतात. ज्यामुळे घरबसल्या लोक वस्तू मिळवू शकतात

या वस्तु घरी येतात तेव्हा त्या नेहमीच एका बॉक्समध्ये पॅक करुन येतात. मग ती वस्तू अगदी लहान असू देत किंवा मोठी

तुम्ही कधी विचार केलाय की ज्या बॉक्स पॅकिंगमधून वस्तु येते तो बॉक्स ब्राऊन रंगाचाच का असतो? तो सफेद किंवा निळा का नसतो?

हे पार्सल ज्या कुरिअर बॉक्समधून येते, तो डिलिव्हरी बॉक्स कार्डबोर्डचा किंवा पुठ्ठ्याचे बनलेला असतो, जो संपूर्ण कॉर्पस कागदाचा बनलेला आहे

नैसर्गिकरित्या आपल्याला झाडापासून कागद मिळतो आणि या कागदाला ब्लीच केलं नाही तर तो तपकिरी रंगाचा दिसतो

आपण जे सफेद कागद वापतो, ते ब्लीच केलेले असतात, ज्यामुळे ते थोडे महाग देखील असतात, कारण त्याच्या ब्लीचचा खर्च वाढतो

कागद नैसर्गिकरित्या तपकिरी असतो कारण तो झाडाच्या लाकडू, देठ आणि सालीपासून बनवला जातो. त्यामुळेच ते तपकिरी रंगाचे असतात

आपण जेव्हा Amazon आणि Flipkart सारख्या कंपन्यांकडून वस्तू मागवतो, तेव्हा आपल्याला ती कमीत कमी पैशांमध्ये हवी असते

कोणताही ग्राहक पॅकिंगसाठी जास्त पैसे देऊ मागत नाही, त्यामुळे या कंपन्यां कार्डबोर्डच्या ब्लीचिंगवर पैसे खर्च करत नाहीत

ज्यामुळे हे बॉक्स कमीत कमी पैशात विकत घेऊन किंवा बनवून ते आपल्यापर्यंत पोहोचवतात