JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जमिनीवर अवतरलं इंद्रधनुष्य; झुळझुळ वाहणारी कलरफुल नदी कधी पाहिलीत का?

जमिनीवर अवतरलं इंद्रधनुष्य; झुळझुळ वाहणारी कलरफुल नदी कधी पाहिलीत का?

या नदीचं पाणी पाच रंगांचं आहे. या नदीला लिक्विड रेनबो (The liquid rainbow) असंही म्हटलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बोगोटा, 08 जून : कलरफुल नदी… वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही. अशी नदी असूच शकत नाही असं तुम्ही म्हणाल. मात्र हे खोटं नाही. अशी कलरफुल नदी आहे, ही नदी पाहिल्यानंतर जणू आकाशातील इंद्रधनुष्य जमिनीवरच अवतरल्यासारखं वाटेल. पंचरंगी पाण्यासह ही नदी झुळझुळ करत वाहते. बरं अशी नदी आहे तरी कुठे? अशी नदी आहे कोलंबियात. कोलंबियातील कॅनो क्रिस्टेल्स (Caño Cristales) नदी. या नदीला गार्डन ऑफ ईडन (Garden of Eden) किंवा लिक्विड रेनबो (The liquid rainbow) म्हणूनही ओळखलं जातं. शेरेनिया डे ला मॅकरिना (Serranía de la Macarena) पर्वत शृखंलांमधून ही नदी वाहते. हे वाचा -  निसर्गाने बदलला रंग; अंटार्क्टिकातील डोंगरावरील पांढऱ्या बर्फाचा रंग हिरवा झाला जुलै ते नोव्हेंबर महिन्यात ही नदी पाहण्यासाठी कित्येक पर्यटक येतात. कारण एखाद्या सुंदर पेटिंगप्रमाणे ही नदी पाच रंगांत वाहते. लाल, पिवळा, हिरवा, निळा आणि काळा असे रंग या नदीत पसरलेले असतात.

काय आहे नदीच्या रंगाचं गुपित? या नदीत सर्वात जास्त दिसणारा रंग आहे लाल. मॅकेरिनिया क्लेविगेरा नावाचे विशेष प्रकारचं झाड या नदीच्या पृष्ठभागावर आहे. याशिवाय नैसर्गिकरित्या नदीचं पाणी निळं आहे. पाण्याच्या आत काळी दगडं आहेत तर हिरवी वाळू आणि पिवळे शेवाळ आहेत.  सूर्याची किरणं आणि उंचावरून उड्या मारणारे झरे नदीचं आकर्षण अधिकच वाढवतात. या नदीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं कोणतेही जंगली जीव-जंतू नाहीत. कारण यात भरपूर दगडं आहेत. हे वाचा -  इथे आहे जगातील सर्वात शुद्ध आणि स्वच्छ हवा; शास्त्रज्ञांना सापडलं ते ठिकाण बरं अशी नदी पाहिल्यानंतर त्यात कुणाला जावंसं वाटणार नाही. कुणाला त्यामध्ये पोहोचण्याचा मोह आवरणार नाही? मात्र तुमची ही इच्छादेखील इथं पूर्ण होते. या नदीत फक्त पोहोण्यसाठीच नव्हे तर नदीचं सौंदर्य आतून पाहण्याची व्यवस्थाही इथल्या सरकारने केली आहे. संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या